शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

शहर परिसराला ‘निसर्गाने’ झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:47 IST

नाशिक : शहर व परिसराला निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सोसाट्याचा वारा व जोरदार पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारी दिवसभर आपली हजेरी कायम ठेवली. त्याचबरोबर चक्रीवादळाच्या संभाव्य इशाऱ्यामुळे शहरही काहीसे ठप्प झाले.

नाशिक : शहर व परिसराला निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सोसाट्याचा वारा व जोरदार पावसाने झोडपून काढल्याने जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारी दिवसभर आपली हजेरी कायम ठेवली. त्याचबरोबर चक्रीवादळाच्या संभाव्य इशाऱ्यामुळे शहरही काहीसे ठप्प झाले. या पावसामुळे गंगापूररोडवरील पंपिंग स्टेशन येथे झाडाची फांदी अंगावर पडल्याने महिला किरकोळ जखमी झाली, तर रविवार पेठेत जुन्या वाड्याचा काही भाग कोसळला. वादळामुळे हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आपत परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच निसर्ग चक्रीवादळ नाशिक जिल्हा मार्गाने पुढे मार्गस्थ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने मंगळवारी वर्तविला असला तरी, तत्पूर्वीच मंगळवारी सकाळपासूनच शहरात पावसाने मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण व हवेत गारवा निर्माण झाल्यााने नागरिक सुखावले. त्यातच रात्रीपासून शहर व परिसरात पावसाचे आगमन झाले. बुधवारी सकाळपासून पावसाची सुरू झालेली रिपरिप दिवसभर कायम राहिली. दुपारी बारा वाजेनंतर सरासरी ३५ ते ४० वेगाने वारे वाहू लागले तर तीन वाजता सर्वत्र काळोख पसरून जोरदार वारा व तुफान पाऊस सुरू झाला. सुमारे अर्धा तासाहून अधिक वेळ सुरू असलेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांनी रेनकोट, छत्र्या बाहेर काढल्या. निसर्ग चक्रीवादळाचा दोन दिवस मुक्काम राहणार असून, या काळात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने पूरसदृश परिस्थिती हाताळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली. जुने नाशिक, पंचवटी भागातील धोकादायक घरे, नदीकाठच्या रहिवाशांना तातडीने स्थलांतरित होण्याच्या सूचना महापालिकेच्या वतीने देण्यात आल्या.दुपारनंतर वादळाचा जोर वाढणार असल्याच्या वृत्ताने नागरिकांनी घरातच बसणे पसंत केले, तर सरकारी कार्यालये, निमशासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी, अधिकाऱ्यांनी लवकर घराचा रस्ता धरल्याने शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले. सायंकाळी ७ वाजेनंतर पावसाने जोर धरला. वादळी वाºयासह कोसळलेल्या या पावसामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. साधारणत: दोन तास पावसाने तुफान झोडपून काढले.दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे रविवार पेठेतील गुंबाडे वाड्याचा काही धोकेदायक भाग कोसळू लागताच, तात्काळ अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. या तीन मजली जुन्या वाड्याच्या आजूबाजूच्या रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवून अग्निशामक दलाच्या जवानाने वाड्याचा धोकादायक भाग उतरविला. शहरात अन्य ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या असून, महापालिकेच्या कर्मचाºयांनी धाव घेऊन ते बाजूला केले.---------------------शॉक लागून महिला ठारभगूरजवळील राहुरी येथे पावसामुळे पोल्ट्री फार्ममध्ये वीजप्रवाह उतरून शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला. राहुरी रोडवरील रमेश पानसरे यांच्या पोल्ट्री फार्मवर कामावर असलेल्या यशोदा ज्ञानेश्वर पवार (४५) या पोल्ट्री फार्मवर गेल्या असता पावसामुळे पाण्यात वीजप्रवाह उतरल्याने त्यांचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. त्यांना कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक