मुंडेंच्या निधनामुळे शहर शोकमग्न

By Admin | Updated: June 4, 2014 01:24 IST2014-06-04T01:12:14+5:302014-06-04T01:24:13+5:30

मुंडेंच्या निधनामुळे शहर शोकमग्न

The city mourns because of Munda's death | मुंडेंच्या निधनामुळे शहर शोकमग्न

मुंडेंच्या निधनामुळे शहर शोकमग्न

 

नाशिक : जनसामान्यांच्या कामांसाठी तत्पर असलेले सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांशी स्नेहबंध जपणारे भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने सार्‍यांनाच धक्का बसला. शोक अनावर झाल्याने अनेक कार्यकर्त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले. अनेक कार्यकर्त्यांनी मुंबईकडे धाव घेतली, तर काहींनी परळी येथे अंत्यसंस्कारासाठी जाण्याची तयारी केली आहे. जनसंघाच्या काळापासून नाशिकशी नाते जपणार्‍या गोपीनाथ मुंडे यांना मानणारा नाशिकमध्ये मोठा वर्ग होता. भाजपा कार्यकर्त्यांबरोबरच अनेकांना सहजपणे त्यांची मुंबई, दिल्लीत भेट मिळत असे आणि सरकार दरबारातील अडचणी दूर होत. त्यामुळे मुंडे यांचे सकाळी अपघातात निधन झाल्याचे वृत्त धडकल्यानंतर शहरावर शोककळा पसरली. सकाळी भाजपा कायकर्त्यांनी तातडीने वसंतस्मृती येथे धाव घेतली. कार्यकर्त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. सारेच दु:खात असल्याने कोणालाही सावरणे कठीण होत होते. केवळ भाजपाच नव्हे, तर अन्य पक्षीय नेत्यांनीही भाजपा कार्यालयाकडे धाव घेतली. भाजपा कार्यकर्त्यांबरोबरच महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, आमदार वसंत गिते, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, बहुजन समाज पार्टीचे दिनकर पाटील, शहर विकास आघाडीचे नगरसेवक संजय चव्हाण, भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश गायधनी, तसेच माजी महापौर बाळासाहेब सानप, प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे, सीमा हिरे, महेश हिरे, विजय साने, अरुण शेंदुर्णीकर, नाना शिलेदार, पुष्पा शर्मा, गणेश कांबळे, उत्तम उगले यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. सायंकाळपर्यंत अनेक नागरिकांनीही याठिकाणी हजेरी लावली. मुंडे यांच्या निधनामुळे अनेक कार्यकर्ते मुंबईकडे निघाले असून, तेथे भाजपा मुख्यालयात अंत्यदर्शन घेणार आहेत. बुधवारी परळी येथे मुंडे यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून, तेथेही शेकडो कार्यकर्ते जाणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The city mourns because of Munda's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.