शहरातील लस संपल्याने पुन्हा ठणठाणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST2021-04-30T04:19:42+5:302021-04-30T04:19:42+5:30

नाशिक जिल्ह्याला गेल्या रविवारी (दि.२५) एकूण ७८ हजार लसींचे डोस मिळाले होते. त्यातील तीस हजार डाेस नाशिक महापालिकेला मिळाले; ...

The city has run out of vaccines | शहरातील लस संपल्याने पुन्हा ठणठाणाट

शहरातील लस संपल्याने पुन्हा ठणठाणाट

नाशिक जिल्ह्याला गेल्या रविवारी (दि.२५) एकूण ७८ हजार लसींचे डोस मिळाले होते. त्यातील तीस हजार डाेस नाशिक महापालिकेला मिळाले; परंतु सोमवारी दुपारपर्यंत त्याचे वितरण सुरू असल्याने अनेकांना त्या दिवशी डोस मिळाला नाही. मंगळवारपासून ते गुरुवार असे अवघे तीन दिवस लसीकरण करण्यात आले; परंतु आता लसींचे डोस संपल्याने शुक्रवारी (दि.३०) लसीकरण होण्याची शक्यता खूपच धूसर आहे. विशेष म्हणजे यंदा ७८ पैकी सुमारे ७५ हजार कोविशिल्ड तर उर्वरित म्हणजे अवघे तीन हजार कोवॅक्सिनचे डोस होते. त्यामुळे अडचण झाली. कोविक्सिनचा पहिला डाेस घेणाऱ्यांना दुसरा डोस घेण्यासाठी धावाधाव करावी लागली तर दुसरीकडे काेविशिल्ड देतानाही दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्यांनाच प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे अडचण निर्माण झाली. आता शुक्रवारपासून लसीकरण होणार किंवा नाही याबाबत साशंकता आहे.

Web Title: The city has run out of vaccines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.