शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

शहर, परिसराला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 1:44 AM

गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी दुपारनंतर विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडून जनजीवन विस्कळीत झाले. नाशिकरोड, इंदिरानगर, वडाळा या भागांतही मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊन दाणाफाण उडाली.

ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत : रस्त्यांवर साचले पाणी

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी दुपारनंतर विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडून जनजीवन विस्कळीत झाले. नाशिकरोड, इंदिरानगर, वडाळा या भागांतही मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊन दाणाफाण उडाली.गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असून, कडक उन्ह पडत असल्याने हवेत उकाडा वाढला आहे. गेल्या आठवड्यात दररोज दुपारनंतर तास, अर्धातास हजेरी लावणाºया पावसाने गेल्या दोन दिवसांपासून मात्र विश्रांती घेतली होती. त्यामुळे जनजीवन पूर्ववत होत असताना शुक्रवारी दुपारनंतर आकाशात अचानक ढगांची गर्दी होऊन विजेचा कडकडाट सुरू झाला व पाठोपाठ पावसाने हजेरी लावली. साधारणत: अर्धातास जोरदार कोसळून पावसाचा वेग मंदावला त्यानंतर पुन्हा अधून-मधून त्याची हजेरी कायम राहिली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली तर रस्त्यावरील विक्रेते, हातगाडी, फेरीवाल्यांची पळापळ झाली.नाशिकरोडला झोडपलेनाशिकरोड परिसरात दुपारी साडेचार वाजेपासून मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असल्याने रस्त्यावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. दिवसभर कमालीचा उकाडा होत होता. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जोरदार वाºयासह मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने रस्त्यावरील विक्रेते, पादचारी, दुचाकीस्वार यांना आजूबाजूला आडोसा शोधावा लागला होता. काळे ढग दाटून आल्याने काळोखमय परिस्थिती निर्माण झाली. काही भागांतील वीजपुरवठा बंद करण्यात आला.इंदिरानगरला रस्ते जलमयइंदिरानगर परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्ते जलमय झाले होते. मोदकेश्वर मंदिरासमोरील रस्ता, सूचितानगर, बापू बंगला बसथांबा, चार्वाक चौक, पेठेनगर कॉर्नर, पिंगळे चौक, राणेनगर कॉर्नर, कानिफनाथ चौकालगत असलेला रस्ता, आधीसह परिसरातील चौकात पावसाचे पाणी साचले. तसेच परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा पावसाचे पाणी वाहत होते त्यामुळे वाहनधारकांना मार्ग करताना तारेवरची कसरत करावी लागत होती.पावसाने अक्षरश: एक-दीड तास नाशिकरोड परिसराला झोडपून काढले. त्यामुळे शिवाजीपुतळा, देवीचौक बाजारपेठ, सुभाषरोड, पवारवाडी, आर्टिलरी सेंटररोड, जेलरोड, उपनगर, सिन्नरफाटा, देवळालीगाव गांधी पुतळा आदी भागांमध्ये चेंबर तुंबल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. यामुळे काही दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस