शहर, परिसराला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:44 AM2020-09-12T01:44:00+5:302020-09-12T01:44:36+5:30

गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी दुपारनंतर विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडून जनजीवन विस्कळीत झाले. नाशिकरोड, इंदिरानगर, वडाळा या भागांतही मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊन दाणाफाण उडाली.

The city, the area was flooded by rain | शहर, परिसराला पावसाने झोडपले

शहर, परिसराला पावसाने झोडपले

Next
ठळक मुद्देजनजीवन विस्कळीत : रस्त्यांवर साचले पाणी

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी दुपारनंतर विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडून जनजीवन विस्कळीत झाले. नाशिकरोड, इंदिरानगर, वडाळा या भागांतही मुसळधार पर्जन्यवृष्टी होऊन दाणाफाण उडाली.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असून, कडक उन्ह पडत असल्याने हवेत उकाडा वाढला आहे. गेल्या आठवड्यात दररोज दुपारनंतर तास, अर्धातास हजेरी लावणाºया पावसाने गेल्या दोन दिवसांपासून मात्र विश्रांती घेतली होती. त्यामुळे जनजीवन पूर्ववत होत असताना शुक्रवारी दुपारनंतर आकाशात अचानक ढगांची गर्दी होऊन विजेचा कडकडाट सुरू झाला व पाठोपाठ पावसाने हजेरी लावली. साधारणत: अर्धातास जोरदार कोसळून पावसाचा वेग मंदावला त्यानंतर पुन्हा अधून-मधून त्याची हजेरी कायम राहिली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली तर रस्त्यावरील विक्रेते, हातगाडी, फेरीवाल्यांची पळापळ झाली.
नाशिकरोडला झोडपले
नाशिकरोड परिसरात दुपारी साडेचार वाजेपासून मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असल्याने रस्त्यावरील वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. दिवसभर कमालीचा उकाडा होत होता. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जोरदार वाºयासह मुसळधार पावसाचे आगमन झाल्याने रस्त्यावरील विक्रेते, पादचारी, दुचाकीस्वार यांना आजूबाजूला आडोसा शोधावा लागला होता. काळे ढग दाटून आल्याने काळोखमय परिस्थिती निर्माण झाली. काही भागांतील वीजपुरवठा बंद करण्यात आला.
इंदिरानगरला रस्ते जलमय
इंदिरानगर परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्ते जलमय झाले होते. मोदकेश्वर मंदिरासमोरील रस्ता, सूचितानगर, बापू बंगला बसथांबा, चार्वाक चौक, पेठेनगर कॉर्नर, पिंगळे चौक, राणेनगर कॉर्नर, कानिफनाथ चौकालगत असलेला रस्ता, आधीसह परिसरातील चौकात पावसाचे पाणी साचले. तसेच परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर दुतर्फा पावसाचे पाणी वाहत होते त्यामुळे वाहनधारकांना मार्ग करताना तारेवरची कसरत करावी लागत होती.


पावसाने अक्षरश: एक-दीड तास नाशिकरोड परिसराला झोडपून काढले. त्यामुळे शिवाजीपुतळा, देवीचौक बाजारपेठ, सुभाषरोड, पवारवाडी, आर्टिलरी सेंटररोड, जेलरोड, उपनगर, सिन्नरफाटा, देवळालीगाव गांधी पुतळा आदी भागांमध्ये चेंबर तुंबल्याने पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. यामुळे काही दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.

Web Title: The city, the area was flooded by rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.