इंदिरानगर परिसरात खंडित वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:25 IST2020-08-22T22:27:31+5:302020-08-23T00:25:04+5:30

इंदिरानगर : इंदिरानगर व वडाळागाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून वेळोवेळी विद्युतपुरवठा खंडित होत असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याची तयारी नागरिकांनी चालविली आहे.

Citizens suffer due to power outage in Indiranagar area | इंदिरानगर परिसरात खंडित वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त

इंदिरानगर परिसरात खंडित वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त

ठळक मुद्दे दिवसभरात अनेकवेळा अर्धा ते एक तास वीज पुरवठा खंडित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
इंदिरानगर : इंदिरानगर व वडाळागाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून वेळोवेळी विद्युतपुरवठा खंडित होत असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याची तयारी नागरिकांनी चालविली आहे.
गेल्या महिन्यापासून इंदिरानगर परिसरात महारुद्र कॉलनी , अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनी, देवदत्त सोसायटी , जिल्हा परिषद कॉलनी, देवेंद्र सोसायटी , कला नगर , परब नगर ,श्री जयनगर परिसर, वडाळा गावातील सादिक नगर, मेहबूब नगर, मनपा घरकुल योजना परिसरात दिवसभरात अनेकवेळा अर्धा ते एक तास वीज पुरवठा खंडित होत आहे.
वारंवार होणाऱ्या विजेचा लपंडाव मुळे घरगुती वीज उपकरणांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तसेच वीज पुरवठा सुरळीत होत नसेल तर महावितरण कंपनीने वीज देयके सुद्धा नागरिकांना वाटू नये. येत्या दहा दिवसात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास भाजपच्या वतीने जनआंदोलन छेडण्यात येईल इशारा देण्यात आला असून, या संदर्भात नगरसेवक अ‍ॅड. अजिंक्य साने यांनी मुख्य अभियंत्यांना दिले आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शाळेने आॅनलाइन शिक्षण सुरू केले आहे मात्र वीजपुरवठा खंडित झाला की यंत्रणा बंद पडते यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे वीज कंपनीनेने वीजपुरवठा सुरूळीत करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Citizens suffer due to power outage in Indiranagar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.