ओझर परिसरात नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांना हरताळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 22:06 IST2020-06-25T22:06:21+5:302020-06-25T22:06:58+5:30
ओझर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या नियमांची ओझर शहरासह परिसरात पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने अटी-शर्थींवर सुरू केलेल्या अनलॉकमुळे नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती दूर झाल्याचे विनामास्क व शारीरिक अंतर न पाळल्यात येण्याच्या प्रकारांवरून दिसते आहे.

ओझर परिसरात नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांना हरताळ
ओझर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या नियमांची ओझर शहरासह परिसरात पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शासनाने अटी-शर्थींवर सुरू केलेल्या अनलॉकमुळे नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती दूर झाल्याचे विनामास्क व शारीरिक अंतर न पाळल्यात येण्याच्या प्रकारांवरून दिसते आहे.
जानेवारीत संपूर्ण देशात कोरोनाने आक्रमण केले, तर जूनमध्ये बाधितांची संख्या प्रमाणापेक्षा वाढली. मध्यंतरी सरकारने लॉकडाऊन जाहीर करून देश शांत केला. त्यावेळी काही अंशत: बाजार सोडला तर सगळंच बंद होतं. माणसाला त्याच्या नेमक्या मूलभूत गरजा घरात बसून समजल्या. त्यावेळी तर जे चंचल स्वभावाचे होते त्यांनी स्वाभाविक दंडुकेदेखील खाल्ले, तर अनेकांवर छोटे-मोठे गुन्हे दाखल झाले. पोलिसांवरचा ताण हा सामान्य माणसाला बघवत नव्हता. एकट्या ओझर पोलीस ठाण्याच्या भागाचा विचार केला तर पाच हजार लोकांमध्ये एक पोलीस असा आकडा होता. त्यामुळे हा सगळीकडे स्वयंशिस्त लावण्याचा प्रकार होता, परंतु सर्वत्र लोकांनी केवळ घाबरून घरात राहणे पसंत केल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
मात्र, सरकारने अनलॉक फेज सुरू केल्यानंतर नाशिकसह ग्रामीण भागात दररोजची वाढणारी आकडेवारी चिंतेचा विषय ठरू पाहतेय. जी भीती लोकांना लॉकडाऊन असताना कमी आकडेवारीत होती ती आता पाचपटीने आकडे वाढूनदेखील राहिलेली नसल्याचे नागरिकांच्या निर्धास्त वागणुकीवरून दिसू लागले आहे.ग्रामीण भागात परिस्थिती भयावह आहे. फिजिकल डिस्टन्सिंग न पाळता नागरिकांमधील कोरोनाची भीती पळाली आहे. आज अनेक ठिकाणी पोलीस पकडतील म्हणून मास्क जवळ ठेवतात, मात्र पोलीस किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांची पाठ फिरतात नागरिक पुन्हा मास्क खिशात ठेवत असल्याचे दिसून येत आहे.