देवळ्यात मूर्ती दानाला नागरिकांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:15 IST2021-09-21T04:15:40+5:302021-09-21T04:15:40+5:30
प्रशासनाने कोरोनाच्या संकटकाळात गणेशोत्सव साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासन व पोलीस प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार नगरपंचायतीच्या वतीने शहरात सहा ठिकाणी ...

देवळ्यात मूर्ती दानाला नागरिकांचा प्रतिसाद
प्रशासनाने कोरोनाच्या संकटकाळात गणेशोत्सव साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासन व पोलीस प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार नगरपंचायतीच्या वतीने शहरात सहा ठिकाणी मूर्ती विसर्जन प्रक्रिया करण्यासाठी मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. सर्व केंद्रांवर नगरपंचायत कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. सकाळी ९ वाजेपासून मूर्ती संकलनास सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत आपल्या घरात स्थापन केलेल्या गणेशमूर्ती जमा केल्या. सार्वजनिक तलाव, धरणे, नदी आदी ठिकाणी मूर्ती विसर्जनास शासनाकडून बंदी घालण्यात आलेली होती. नागरिकांनी या बंदीचे स्वागत करून गणेशमूर्ती संकलनास प्रतिसाद देत पर्यावरणाप्रती आपली सजगता दाखवून दिली. देवळा शहरात नगरपंचायत कार्यालयासमोर, मालेगाव नाका, व कळवणरोड, सुभाषरोड, निमगल्ली, इंदिरानगर येथे मूर्ती संकलन केंद्र सुरू करण्यात आली होती.
-------------------
देवळा नगरपंचायत कार्यालयासमोर गणेशमूर्तीचे संकलन करताना नगरपंचायत कर्मचारी. (२० देवळा गणेश २)
-------------------
वडाळा येथे ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना यशस्वीपणे राबवून नंतर साध्या पद्धतीने वारकरी संप्रदायाची जोपासना करण्यात युवकांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय ठरला, तर देवळा शहरातील एका उपनगरात मुलांसाठी पर्यावरणपूरक स्पर्धा घेऊन त्यांच्यात पर्यावरणाविषयी आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मुलांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातून प्रदूषण रोखण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला. प्रत्येकाने मास्कचा वापर केला. गणेश मंडळांना मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यास बंदी असल्यामुळे कोरोनाप्रति जनजागृती व कोविड लसीकरण वाढीसाठी समाज प्रबोधन कार्यक्रम मंडळांनी राबविले.
200921\20nsk_16_20092021_13.jpg
२० देवळा गणेश २