शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

नागरिकांनो, नियमांचे गांभीर्याने पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 10:25 PM

मालेगाव शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मनपातर्फे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे अन्यथा शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त दीपक कासार यांनी दिली.

ठळक मुद्देआयुक्त : मालेगावी कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता उपाययोजना

मालेगाव मध्य : शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता मनपातर्फे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे अन्यथा शहर पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त दीपक कासार यांनी दिली.आयुक्त कासार म्हणाले की, हॉटस्पॉट ठरलेल्या शहरातून कोरोना आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले. त्यामुळेच उद्योग, व्यवसाय सुरळीत होऊन जनजीवन पूर्वपदावर आले; मात्र नागरिकांकडून मास्क, सामाजिक अंतर व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येत नसल्याने बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या अनुषंगाने मनपातर्फे मन्सुरा, सहारा, केबीएच, मसगा महाविद्यालय येथील कोविड केंद्रातील आवश्यक सोयी सुविधांची पाहणी करण्यात आली.व्यवस्थेचा आढावा घेत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत कार्यवाहीचे आदेश देण्यात आले आहे. मसगा महाविद्यालयातील कोविड केंद्रात गृह विलगीकरणातील बाधितांसाठी औषधांची स्वतंत्र व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले. मनपातर्फे ४०० आॅक्सिजन बेडची व्यवस्था तसेच २ हजार १६५ बेडची व्यवस्था. महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांची यादी जाहीर करून रुग्णांवर उपचार करण्यासाठी बंधनकारक केले जाणार. खासगी रुग्णालयातील २० टक्के बेड राखीव असून, खासगी लॅबला चाचणीची परवानगी देण्यात आली. खाजगी रुग्णालयांवर देखरेखीसाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. रस्त्यावर मंडप लावण्यास बंदी करून आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे. बाधितांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत रुग्णालय व खासगी रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिल्यास कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त कासार यांनी सांगितले. बंद केंद्रे पुनर्स्थापित करण्यात आली. १४ सीसीसी केंद्रांमध्ये दोन हजार १६० बेडची व्यवस्था, ६ डीसीएचसी केंद्रात ४७५ बेड व डीसीएच केंद्र सहारा रुग्णालयात १३० अशा एकूण २ हजार ७६५ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मन्सुरा येथे २५, मनपा ५५, हज हाऊस ५०, दिलावर हॉल ७० व सहारा रूग्णालय येथे २०० अशा ४०० आॅक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य