पाणीपट्टी, घरपट्टी माफ करण्याची नागरिकांची मागणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:21 IST2020-03-28T21:15:15+5:302020-03-29T00:21:45+5:30
त्र्यंबकेश्वर : नगर परिषदेने चार महिने घरपट्टी, पाणीपट्टी, दुकान भाडे आदी चार महिन्यांची आकारणी वसूल करू नये, अशी मागणी नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्य तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती त्रिवेणी सोमनाथ तुंगार सोनवणे यांनी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांच्याकडे यादी देऊन केली आहे.

पाणीपट्टी, घरपट्टी माफ करण्याची नागरिकांची मागणी !
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : नगर परिषदेने चार महिने घरपट्टी, पाणीपट्टी, दुकान भाडे आदी चार महिन्यांची आकारणी वसूल करू नये, अशी मागणी नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्य तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती त्रिवेणी सोमनाथ तुंगार सोनवणे यांनी नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांच्याकडे यादी देऊन केली आहे.
तुंगार सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर नगरीतील संपूर्ण अर्थव्यवस्था यात्रेवर अवलंबून आहे. त्र्यंबकेश्वरमधील प्रसादी व्यवसाय हॉटेल्स-लॉजिंग, भाजीबाजार, किराणा, भेटवस्तू मॉल आदी सर्व यात्रेच्या गर्दीवर अवलंबून आहे.
गत महिन्यापासून मंदिरे बंद केल्याने व भाविकांना त्र्यंबकेश्वर बंदी केल्याने नोकरीला बाहेर जाणे-येणे करणाऱ्या नोकरदारांशिवाय कुणी जात येत नाहीत. त्यामुळे हातावर पोट भरणाºया गोरगरिबांची रोजीरोटी बंद झाली आहे.