कोथिंबीरीचा लिलाव ७ लाख ५१ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 17:04 IST2020-09-12T17:04:59+5:302020-09-12T17:04:59+5:30
चांदोरी : निफाड तालुक्यातील धारणगाव वीर येथील शेतकरी योगेश सानप यांच्या तीन एकर कोथिंबीरचा लिलाव सात लाख एकावन्न हजार रु पये विक्र मी उत्पन्न मिळाल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

कोथिंबीरीचा लिलाव ७ लाख ५१ हजार
चांदोरी : निफाड तालुक्यातील धारणगाव वीर येथील शेतकरी योगेश सानप यांच्या तीन एकर कोथिंबीरचा लिलाव सात लाख एकावन्न हजार रु पये विक्र मी उत्पन्न मिळाल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
योगेश सानप यांनी तीन एकर शेतामध्ये पस्तीस किलो कोथिंबीरचे बियाणे पेरले असता पिकाची काळजी घेत मेहनतीने एकेचाळीस दिवसात त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले.
दापुरी येथील व्यापारी किसण आव्हाड व एम डी यांनी कोथंबीरीचा लिलाव ७ लाख ५१ हजार रु पयास व्यवहार निश्चित केला. शेतकऱ्यास भरपूर उत्पन्न मिळाल्याने परिसरात चर्चेचा विषय झाला.
सानप यांनी बाजार भावाची आशा न बाळगता कोथिंबीर पिकाची लागवड केली होती. शेतकºयास निश्चितच फायदा झाल्यामुळे त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केले आहे.