कोथिंबीर ५० रुपये जुडी

By Admin | Updated: March 29, 2017 21:46 IST2017-03-29T21:46:36+5:302017-03-29T21:46:36+5:30

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरसह अन्य पालेभाज्यांची आवक घटल्याने व ग्राहकांकडून मागणी वाढल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत.

Cilantro 50 rupee pair | कोथिंबीर ५० रुपये जुडी

कोथिंबीर ५० रुपये जुडी

पंचवटी : उन्हाळा सुरू झाल्याने शेतमालाला कमी प्रमाणात पाणी मिळत असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. उत्पादन घटल्याने सर्वच पालेभाज्यांची आवक घटली आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीरसह अन्य पालेभाज्यांची आवक घटल्याने व ग्राहकांकडून मागणी वाढल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत.
बुधवारी बाजार समितीत झालेल्या लिलावात कोथिंबीर ५ हजार रु पये शेकडा (५० रुपये प्रतिजुडी) दराने विक्र ी झाली. कोथिंबीर पाठोपाठ मेथी २५ रुपये, कांदापात १७ रुपये तर शेपू १५ रुपये प्रतिजुडी दराने विक्र ी झाली आहे. उन्हाळा सुरू होताच पालेभाज्या आवक कमी होत असल्याने बाजारभाव तेजीत येण्यास सुरुवात झाली आहे. आगामी कालावधीत शेतमालाला पाणी कमी पडल्यास उत्पादन घटून आवक कमी होईल व परिणामी बाजारभाव आणखीच भडकण्याची शक्यता आहे. बाजार समितीतील साईधन व्हेजिटेबल कंपनीत कोथिंबीर ५० रुपये प्रतिजुडी दराने विक्र ी झाल्याचे नितीन लासुरे यांनी सांगितले.

Web Title: Cilantro 50 rupee pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.