सिडकोत गावठी कट्टे जप्त

By Admin | Updated: June 5, 2015 00:18 IST2015-06-05T00:18:00+5:302015-06-05T00:18:44+5:30

सिडकोत गावठी कट्टे जप्त

Cidkot basti hoarse seized | सिडकोत गावठी कट्टे जप्त

सिडकोत गावठी कट्टे जप्त

नाशिक : बेकायदेशीरपणे गावठी कट्टे जवळ बाळगून त्यांची विक्री करणाऱ्या तिघा बिहारी तरुणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. हे तरुण संभाजी स्टेडियमजवळील अश्विनीनगर येथे या कट्ट्यांची विक्री करीत होते.
गुन्हे शाखा युनिट-३ चे पोलीस हवालदार जाकीर हुसेन शेख यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तीन बिहारी तरुण विनापरवाना बेकायदा गावठी कट्टे स्वत:जवळ बाळगून ते अश्विनीनगर येथे विक्रीसाठी येणार असल्याचे समजले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. गोंधे, जी. डी. देवडे, सुभाष गुंजाळ, पोलीस हवालदार जाकीर शेख, गंगाधर केदार, इरफान शेख, शांताराम महाले, मोहन देशमुख, शंकर गडदे यांनी शिवाजी स्टेडियमच्या प्रवेशद्वारासमोर सापळा रचला. काही वेळानंतर त्या ठिकाणी तीन तरुणांच्या संशयास्पद हालचाली बघून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Cidkot basti hoarse seized