सिडकोतील पथदीप बंद
By Admin | Updated: May 10, 2014 23:53 IST2014-05-10T22:08:01+5:302014-05-10T23:53:16+5:30
नाशिक : मायको सर्कल ते सिडको दरम्यानचे पथदीप अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़

सिडकोतील पथदीप बंद
नाशिक : मायको सर्कल ते सिडको दरम्यानचे पथदीप अनेक दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़
मायको सर्कल ते सिडको या मार्गावरून सिडको, कामटवाडे, अंबड औद्योगिक वसाहतीत जाणार्या नागरिकांची संख्या मोठी आहे़ सायंकाळनंतर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते़ मात्र गेल्या आठ दिवसांपासून या भागातील पथदीप बंद आहेत़ यामुळे प्रामुख्याने पादचारी, तसेच सायकलस्वारांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या वाहनांचे हेडलाईट डोळ्यावर चमकत असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे़ तसेच रात्री उशिरा या रस्त्यावर लुटमारीच्या घटना घडत आहेत़ यामुळे सदर पथदीप तत्काळ सुरू करण्याची मागणी होत आहे़