शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत बँकेचे लॉकर तोडले; कामठवाड्यात एक लाखाची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 19:49 IST

नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख उंचावत चालला असून, निर्मनुष्य घरांसोबत छोट्या मोठ्या बँका आणि पतंसस्थांवरही चोरट्यांनी त्यांची नजर वळविली आहे. त्यातूनच सिडकोत बुधवारी (दि.१२) एकाच दिवशी दोन चोरीच्या घटनांमध्ये लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले आहे. 

ठळक मुद्देनाशिकमध्ये चोऱ्यांचे सत्र सिडकोत बँकेेचे लॉकर तोडलेकामठवाडेत घरफोडीत एक लाख लंपास

नाशिक : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख उंचावत चालला असून, निर्मनुष्य घरांसोबत छोट्या मोठ्या बँका आणि पतंसस्थांवरही चोरट्यांनी त्यांची नजर वळविली आहे. त्यातूनच सिडकोत बुधवारी (दि.१२) एकाच दिवशी दोन चोरीच्या घटनांमध्ये लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले असून, चोरट्यांनी कामठवाडे येथे घरफोडी, तर सिडकोत चक्क बँकेची तिजोरी फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे. घरात कोणी नसल्याचा फायदा गेत अज्ञात चोरट्याने लॉकरमधून एक लाख १० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना मुरारीनगर, कामटवाडा, अंबड लिंक रोड येथे घडली. याप्रकरणी योगेश्वर वाल्मीक शेळके (२६) यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शेळके यांच्या गैरहजेरीत चोरट्याने दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून एक लाख १० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ते घरी आले असता घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात फि र्याद दिली, तर दुसरी घटना विठ्ठल मंगल कार्यालयाजवळील साईप्रसाद अपार्टमेंटमध्ये इकविटास बँकेत घडली. अज्ञात चोरट्याने बँकेच्या बंद दरवाजाचा कोयंडा तोडून बँकेची तिजोरी फोडत ४६ हजार ३६५ रुपये लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी अजय अशोक जाधव यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसThiefचोरRobberyचोरी