सिडकोत धोकादायक वीजतारांचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:43 PM2017-10-24T23:43:08+5:302017-10-25T00:14:34+5:30

येथील बहुतांशी नागरिकांच्या घरांवरच उच्चदाबाच्या वीजतारांचे जाळे पसरलेले असून, विजेचा धक्का लागून अनेकजण जखमी होण्याचे प्रकारही कायमचे झालेले असतानाही याकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले असल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Cidcoat network of dangerous wireless networks | सिडकोत धोकादायक वीजतारांचे जाळे

सिडकोत धोकादायक वीजतारांचे जाळे

Next

सिडको : येथील बहुतांशी नागरिकांच्या घरांवरच उच्चदाबाच्या वीजतारांचे जाळे पसरलेले असून, विजेचा धक्का लागून अनेकजण जखमी होण्याचे प्रकारही कायमचे झालेले असतानाही याकडे वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले असल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.  गेल्या आॅगस्ट महिन्यात घराच्या गच्चीवर केबलचे काम करीत असताना गच्चीजवळून गेलेल्या उच्चदाबाच्या वाहिनीचा धक्का लागून तिघे जण जखमी झाल्याची घटना सिडकोतील दत्तचौक भागात घडली होती. यावेळी याठिकाणी पाहणी करण्यासाठी राजकीय नेत्यांनी गर्दी केली होती. तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनीदेखील पाहणी करून येथील वीजतारा त्वरित भूमिगत करण्यात येणार असल्याचे आश्वासन नागरिकांना दिले होते. परंतु प्रत्यक्षात अद्यापही कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. सिडको भागातील काही प्रभागांत नगरसेवकांनी पुढाकार घेऊन प्रभागातील वीजतारा भूमिगत केल्या असल्यातरी आजही संपूर्ण सिडकोचा विचार करता दत्तचौक, राणाप्रताप चौक, साईबाबनगर, मोरवाडी, तोरणानगर, राजरत्ननगर, त्रिमूर्ती चौक यांसह अजूनही इतर भागांत मोठ्या प्रमाणात वीजतारा भूमिगत झालेल्या नाहीत. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दरम्यान गच्चीवर पतंग उडविताना अनेकांना उच्चदाबाच्या वीजतारांचा धक्का लागल्याचे प्रकार घडले असून, यापुढील काळात तरी वीज वितरण कंपनीने धोकादायक वीजतारा भूमिगत करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
प्रश्न सुटणार कधी?
दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवसात गच्चीवर पतंग उडवित असताना वीज तारांचा शॉक लागून अनेकजण जखमी झाले असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. यापुढील काळातरी अशा दुर्दैवी घटना घडू नये यासाठी वीज वितरण कंपनी याबाबत गांभीर्य दाखविणार का? असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे. याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभा तसेच प्रभाग सभेत आवाज उठविला असला तरी अद्यापही सिडको भागातील वीजतारा भूमिगत करण्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही.

Web Title: Cidcoat network of dangerous wireless networks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.