शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत अखेर दूषित पाणी झाले स्वच्छ

By admin | Updated: August 25, 2016 00:12 IST

पालिकेला आली जाग : काही ठिकाणी अजूनही गढूळ पाणीपुरवठा

 सिडको : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण सिडको भागात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता, परंतु यानंतर उशिराने का होईना महापालिकेस जाग आली व त्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. यात सिडकोतील काही भागात आज स्वच्छ तर काही भागात मात्र अद्यापही दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.सिडको भागात गेल्या काही दिवसांपासून साबणाचा वास असलेला व दूषित पाणीपुरवठा होत होता. यामुळे अनेकांना पोटदुखी तसेच उलट्या होत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत मनपास कळवूनही दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यानंतर पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याचे आदेशही सिडको प्रभाग सभापती अश्विनी बोरस्ते यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. पाणीपुरवठा सुरळीत असला तरी केवळ पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे सिडकोत नेहमीच पाणीपुरवठ्याबाबत ओरड असते. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सिडकोतील राणाप्रताप चौक, दत्त चौक, गणेश चौक, विजयनगर, औदुंबर स्टॉप परिसर, तुळजाभवानी चौक, शुभम पार्क परिसर, उपेंद्रनगर यांसह संपूर्ण सिडको भागातच दूषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत होता. दरम्यान, याबाबत आज मनपा सिडको पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख संजय बच्छाव यांनी दखल घेतली. यात पाण्यात देण्यात येणारा तुरटीचा डोस बदलण्यात आला. यामुळे आज सिडको भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याचे मनपाकडून सांगण्यात येत असले तरी अजूनही काही भागात मात्र गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)