सिडकोत नगरसेवक आपल्या दारी
By Admin | Updated: July 23, 2015 00:27 IST2015-07-23T00:26:08+5:302015-07-23T00:27:02+5:30
सिडकोत नगरसेवक आपल्या दारी

सिडकोत नगरसेवक आपल्या दारी
सिडको : दाट लोकसंख्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडको भागात नागरिकांना पाणीपुरवठा न होणे, पथदीप बंद असणे, साफसफाई होत नाही यांसारख्या समस्यांचा दररोजच सामना करावा लागतो. त्या समस्या तत्पर सोडविल्या जाव्यात यासाठी प्रभाग ४३ चे नगरसेवक अॅड. अरविंद शेळके यांनीच पुढाकार घेत थेट नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेच्या वतीने नागरिकांकडून घरपट्टी, पाणीपट्टी यांसह इतर करांच्या माध्यमातून कर वसुली केली जाते. त्यामुळे नागरिकांनाही त्यांच्या मूलभूत समस्या सुटल्या जाव्यात अशीच अपेक्षा असते. मनपाकडूनही त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात असला तरी त्या सोडविण्यात मनपा कर्मच्याऱ्यांकडून पाहिजे तशी तत्परता दाखविली जात नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. मनपा सिडको विभागाच्या वतीने स्वतंत्र तक्रार निवारण कक्षही सुरू केला आहे.