सिडकोत सराफांचे सात लाखांचे दागिने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST2021-09-25T04:14:59+5:302021-09-25T04:14:59+5:30
सिडकोतील शुभम पार्क, बंदावनेनगर येथे प्रमोद विभांडीक यांचे सद्गुरू अलंकार या नावाने सराफी दुकान आहे. नेहमी प्रमाणे विभांडीक यांनी ...

सिडकोत सराफांचे सात लाखांचे दागिने पळविले
सिडकोतील शुभम पार्क, बंदावनेनगर येथे प्रमोद विभांडीक यांचे सद्गुरू अलंकार या नावाने सराफी दुकान आहे. नेहमी प्रमाणे विभांडीक यांनी शुक्रवारी (दि.२४) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दुकान उघडले. त्यांनी त्यांच्याकडील दागिण्यांची पिशवी दुकानाच्या आत ठेवली व दुकानाची साफसफाई करून मागील बाजूस पाणी भरण्यासाठी गेले. या दरम्यान त्यांनी शेजारील किराणा दुकानदाराला दुकानाकडे लक्ष ठेवण्याचे सांगितले. या दरम्यानच किराणा दुकानात दोन तरुण सामान घेण्याच्या बहाण्याने आले व त्यांनी दुकानदाराची दिशाभूल केली. तर त्यांचा एक साथीदार शेजारच्या ज्वेलरी शॉपमध्ये घुसला व त्याने प्रमोद विभांडीक यांनी ठेवलेली दागिन्यांची बॅग हातोहात लांबविली. दागिन्यांची पिशवी हातात पडताच, किराणा दुकानात सामान खरेदीसाठी आलेल्या दोघांनी त्यांना सातपूरकडे जाण्याचा रस्ता विचारला. ही बाब दुकानमालकांच्या लक्षात येताच त्यांनी दुकानात धाव घेवून पाहणी केली असता दागिन्यांची बॅग लंपास झाल्याचे लक्षात आले.
या प्रकरणी त्यांनी तातडीने अंबड पोलिसांना खबर दिली. सकाळी भर वर्दळीच्या ठिकाणी सदरचा प्रकार घडल्याने पोलिसांनी आजुबाजुचे दुकाने तसेच सोसायट्यांच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता, चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. विभांडीक यांच्या चाेरीस गेलेल्या बॅगमध्ये तब्बल १५० ग्रॅम वजनाचे तसेच सहा हजार रुपये रोख रक्कम असा ऐकून सात लाख रुपयांचा मुद्देमाल होता.
चौकट====
चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय खरात, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी, पोलिस निरीक्षक श्रीकांत निबांळकर, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, गुन्हे शाखेचे आनंदा वाघ दाखल झाले आहे. त्यांनी लगेचच सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता पत्ता विचारणाऱ्या इसमानेच दागिने ठेवलेली बॅग गायब केली असल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारावर चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.
चौकट===
सहायक पोलीस आयुक्त अनभिज्ञ
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून खून, हाणामाऱ्या व परिसरात दहशत पसरविण्याचे प्रकार घडत आहे. यावर नियंत्रण आणणे तर सोडाच शुक्रवारी (दि.२४) सराफी दुकानातून सुमारे सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग लंपास झाल्याची घटना घडलेली असताना सहायक पोलिस आयुक्तांनी मात्र त्याबाबत अनभिज्ञता दर्शविली. त्यांना या चोरीबाबत विचारणा केली असता दुसऱ्या कामात व्यस्त असल्याचे सांगितले. (फोटो २४ सिडको, सिडको एक)