शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीनिमित्त सिडको-अंबड भगवेमय

By admin | Updated: March 14, 2017 17:08 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिडको भगवेमय झाले.

सिडको : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सिडको भगवेमय झाले. पन्नासहून अधिक मंडळांनी शिवरायांची स्थापना केली असून, दहा मंडळांच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन केले आहे. अंबड पोलिसांच्या वतीने मिरवणूक मार्गासह संपूर्ण परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.सिडको व अंबड परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येते. यंदाच्या वर्षीही परिसरात ठिकठिकाणी भगवे झेंडे व पताका लावून परिसर भगवामय करण्यात आला आहे. जुने सिडको, राणाप्रताप चौक, विजयनगर, गणेश चौक, सावतानगर, त्रिमूर्ती चौक यांसह अंबड गाव व परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी सुमारे साठहून अधिक मंडळांनी मिरवणूक न काढता शिवजयंती साजरी करणार असून, सिडको व अंबडमधील सुमारे दहा मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला आहे. यात सिडको शिवजयंती उत्सव समिती, पवननगर येथील शिवसेना उपमहानगरप्रमुख सुनील पाटील, सिंहस्थनगर येथील छत्रपती प्रतिष्ठान मंडळाचे विनोद चव्हाण, गणेश चौक येथील गणेश चौक मित्रमंडळाचे विपुल देवांग, सोनवणे क्लासेस, शिवराणा प्रतिष्ठान, शिवबा फे्रं ड्स, शिवरत्न मित्रमंडळ, एसएफसी फाउंडेशन, शिल्पकार युवक मित्रमंडळ आदि मंडळांकडून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीचा शुभारंभ उत्तमनगर येथून सायंकाळी होणार आहे. यानंतर राजरत्ननगर, पवननगर, रायगड चौक, सावतानगर, दिव्या अ‍ॅडलॅब मार्गे त्रिमूर्तीचौक येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे.