त्र्यंबक तालुक्यात नाताळ साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:06 IST2020-12-25T17:05:27+5:302020-12-25T17:06:30+5:30
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील ख्रिश्चन बांधवांकडून नाताळ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नाताळनिमित्त चर्चवर विद्यूत रोेषणाई करण्यात आली होती.

त्र्यंबक तालुक्यात नाताळ साजरा
तालुक्याच्या गुजरात हद्दीजवळील खडकओहळ, हेदपाडा, घोडमानी कास, बुगदपाडा, बेज, करंजपाणा, देवदोंगरी, देवडोंगरा व बाफनविहीर आदी गावात नाताळ उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त चर्च व अनेक घर-परिसरात विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी भगवान येशूची प्रार्थना करुन ख्रिश्चन बांधवांनी परस्परांना शुभेच्छा दिल्या.