शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
3
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
4
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
5
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
7
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
8
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
9
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
10
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
11
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
12
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
13
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
14
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
15
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
17
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
18
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
19
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
20
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...

विनयभंग करणाऱ्या शिक्षकास चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 12:31 AM

दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या वर्गशिक्षकास नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी (दि़०१) सकाळच्या सुमारास घडली़ संशयित सुनील कदम असे या वर्गशिक्षकाचे नाव असून, त्याच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

इंदिरानगर : दहावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलच्या वर्गशिक्षकास नागरिकांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी (दि़०१) सकाळच्या सुमारास घडली़ संशयित सुनील कदम असे या वर्गशिक्षकाचे नाव असून, त्याच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंग तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  पीडित विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये शिक्षण घेते आहे़ दहावीला गेलेल्या या मुलीस गुरुवारी (दि़३१) रात्री शाळेची तयारी करण्यास सांगितले असता मी शाळेत जाणार नाही असे सांगून रडण्यास सुरुवात केली़ मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने नववीचे वर्गशिक्षक सुनील कदम हे शाळेतील मधल्या सुटीत अश्लील संवाद साधून जवळिक साधत असत, मात्र, मी त्यांना प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी नववीत नापास करण्याची धमकीही दिली होती़ त्यातच दहावीलाही तेच वर्गशिक्षक असल्याने मला शाळेत जाण्याची भीती वाटत असल्याचे सांगितले़१९ मार्च २०१८ रोजी शिक्षक सुनील कदम याने सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मुलीच्या आईच्या मोबाइलवर फोन केला व मुलीशी संवाद साधला़ तसेच मुलीकडून जॉमेट्रीची प्रश्नपत्रिका मागितली व ती घेण्यासाठी या मुलीच्या घराजवळ गेले़ मात्र, या मुलीने त्यांना घरी बोलावले नाही यावरूनही संशयित कदम याने घरी का बोलावले नाही, अशी विचारणा करून धमकी दिली होती़ त्यानंतर २२ एप्रिल २०१८ रोजी या मुलीच्या इमो मेसेंजरवर अश्लील मेसेज पाठविला होता़  दरम्यान, मुलीच्या वडिलांना हा प्रकार सांगितल्यानंतर शुक्रवारी (दि़१) सकाळी आई, नातेवाईक, पालक व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शाळेत गेले़ त्यांनी शिक्षक सुनील कदम यास जाब विचारून शाळेच्या आवारात तसेच मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच बेदम मारहाण केली़ मुलीच्या आईने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी शिक्षक सुनील कदमविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, सदर शिक्षक कदम यास शालेय प्रशासनाने निलंबित केले आहे.नववीला वर्षभर त्रासअल्पवयीन विद्यार्थिनी ही नववीला असताना वर्गशिक्षक असलेला सुनील कदम शाळेच्या मधल्या सुटीत भेटून जवळिक साधून अश्लील संवाद साधण्याबरोबरच ‘तू मला खूप आवडते, आय लव्ह यू’ असे बोलत असे़ याबाबत घरी काही सांगितले तर नववीच्या वर्गात नापास करेल अशी धमकी देत असे़ दहावीलादेखील कदम हाच वर्गशिक्षक असल्याचे कळाल्याने संबंधित विद्यार्थिनी शाळेतच जाण्यास तयार नव्हती़ आई-वडिलांनी तिला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर हा प्रकार समोर आला़शाळेतील हा प्रकार निंदनीय असून, संबंधित शिक्षकावर शाळेने कठोर कारवाई करावी़ या प्रकारामुळे शाळेतही मुली असुरक्षित असल्याचे समोर आले असून, यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची शाळेने काळजी घ्यावी़- संतोष सोनपसारे, शहराध्यक्ष समता परिषद, नाशिक

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा