चित्रा नक्षत्राने ला केले चीतपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 00:22 IST2020-10-18T22:37:50+5:302020-10-19T00:22:33+5:30
जळगाव नेऊर : गेली दहा-बारा दिवसांपासून जळगाव नेऊर परिसरात मका, सोयाबीनची सोंगणी सुरळीत सुरू होती; मात्र शनिवारी रात्री परिसरात चित्रा नक्षत्राने हजेरी लावल्याने सोंगणी केलेली मका ,सोयाबीन वावरातच भिजत पडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मका, सोयाबीनचा हातातोंडाशी आलेला घास परतीचा पाऊस हिरावून नेतो की काय या शक्यतेने शेतकरी धास्तावला आहे.

जळगाव नेऊर परिसरात सुरू असलेली मका कापणी.
जळगाव नेऊर : गेली दहा-बारा दिवसांपासून जळगाव नेऊर परिसरात मका, सोयाबीनची सोंगणी सुरळीत सुरू होती; मात्र शनिवारी रात्री परिसरात चित्रा नक्षत्राने हजेरी लावल्याने सोंगणी केलेली मका ,सोयाबीन वावरातच भिजत पडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मका, सोयाबीनचा हातातोंडाशी आलेला घास परतीचा पाऊस हिरावून नेतो की काय या शक्यतेने शेतकरी धास्तावला आहे.
द्राक्ष उत्पादक धास्तावला
दहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावले असून, अगोदरच द्राक्ष घड जिरण्याचे प्रमाण वाढल्याने राहिलेला द्राक्ष मालही पावसाने नष्ट होतो की काय अशी शंका शेतकऱ्यांना भेडसावत आहे. परतीच्या पावसाने जोर धरल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागील वर्षाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकरी द्राक्ष पीक वाचवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत महागड्या औषधांच्या फवारण्या करीत आहे.
मागील वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने खर्चदेखील निघाला नव्हता. यावर्षी चार पैसे पदरात पडतील या आशेवर असलेल्या शेतकरी परतीच्या पावसाने धास्तावला आहे.