चिंचखेडच्या तरु णाचा अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 23:34 IST2019-10-03T23:33:14+5:302019-10-03T23:34:17+5:30
दिंडोरी : तालुक्यातील चिंचखेड येथील प्रशांत प्रभाकर पाटील या तरुणाचा चिंचखेड पिंपळगाव रोडवरील पिंपळगाव हद्दीतील गोखले विद्यालयानजीक अपघातात मृत्यू झाला आहे.

चिंचखेडच्या तरु णाचा अपघातात मृत्यू
ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
दिंडोरी : तालुक्यातील चिंचखेड येथील प्रशांत प्रभाकर पाटील या तरुणाचा चिंचखेड पिंपळगाव रोडवरील पिंपळगाव हद्दीतील गोखले विद्यालयानजीक अपघातात मृत्यू झाला आहे.
ट्रॅक्टर आणि दुचाकीची भीषण धडक होऊन हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशांत पाटील याचे वडील प्रभाकर पाटील हे कादवा कारखान्याचे माजी चेअरमन आहेत.
चिंचखेड येथून पिंपळगाव येथे मोटरसायकलने जात असताना, ट्रॅक्टर आणि मोटारसायकल यांच्यात जोरदार धडक होऊन प्रशांत खाली कोसळला. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याला पिंपळगाव बसवंत येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.