पंचवटीत चीनचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 23:29 IST2020-06-20T23:28:39+5:302020-06-20T23:29:57+5:30
पंचवटी : भाजपच्या तपोवन मंडलतर्फे नागचौकात चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात येऊन निषेध नोंदविण्यात आला.

भाजपच्या वतीने आयोजित चिनी वस्तू बहिष्कार आंदोलनात सहभागी राहुल ढिकले, चंद्रशेखर पंचाक्षरी, सुनील केदारे, दिगंबर धुमाळ, श्याम पिंपळकर, सोमनाथ बोडके, धनंजय माने, प्रवीण भाटे, विशाल जेजूरकर, विजय पगार, विलास जोशी आदी.
ठळक मुद्देचीनविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.
पंचवटी : भाजपच्या तपोवन मंडलतर्फे नागचौकात चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात येऊन निषेध नोंदविण्यात आला. प्रथम भारत-चीन सीमारेषेवर झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आमदार राहुल ढिकले यांनी नागरिकांना चिनी वस्तूंचा वापर बंद करावा तसेच चिनी वस्तू खरेदी करू नये, चिनी वस्तूवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले. यावेळी ‘भारत माता की, जय वंदे मातरम’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी देत चीनविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.