चिमुकल्यांनी चित्रांमधून साकारली रस्ता सुरक्षेची वास्तवता
By Admin | Updated: January 18, 2015 01:06 IST2015-01-18T01:05:50+5:302015-01-18T01:06:15+5:30
चिमुकल्यांनी चित्रांमधून साकारली रस्ता सुरक्षेची वास्तवता

चिमुकल्यांनी चित्रांमधून साकारली रस्ता सुरक्षेची वास्तवता
नाशिक : रस्त्यावर वाहन चालविताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी जेणेकरून सर्वांनाच सुरक्षित प्रवासाची अनुभूती घेता येईल हे विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वोत्तम चित्राकृतीद्वारे शनिवारी दाखवून दिले़ निमित्त होते प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या २६व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे़ या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीद्वारे वाहतुकीच्या विविध समस्या व त्यावरील उपायही सुचविले आहेत़ प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत २६वे रस्ता सुरक्षा अभियान विविध उपक्रमांनी साजरे केले जाते आहे़ याच अभियानाचा एक भाग म्हणून शनिवारी सकाळी प्रमोद महाजन गार्डनमध्ये पहिली ते दहावीच्या मुलांसाठी चित्रकला व घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ शालेय वयातच विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व कळावे यासाठी मुलांना माझी आवडती सायकल, माझी गाडी, माझे आवडते चित्र, सायकलची स्वारी, अपघात व नागरिकांचे कर्तव्य, अपघात संबंधित आवडते चित्र, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था - सुरक्षित प्रवास व घोषवाक्य, पर्यावरण वाचवा, प्रदूषण थांबवा व घोषवाक्य हे विषय देण्यात आले होते़