पिंपळगांव हायस्कुलमध्ये मिरची रोपांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 16:33 IST2019-01-18T16:33:03+5:302019-01-18T16:33:34+5:30
पिंपळगांव बसवंत : पिंपळगांव बसवंत हायस्कुलमध्ये फाली उपक्र मांतर्गत विद्यार्थ्यांना शेती व्यवसायाची माहिती व्हावी यासाठी हायस्कुल आवारात उभारलेल्या शेडनेट मध्ये मिरचीच्या रोपांची लागवड करत विद्यार्थ्यांना उत्तम शेती कशी करावी यांची माहिती देण्यात आली.

पिंपळगांव बसवंत येथील पिंपळगांव हायस्कुलमध्ये मिरची रोपांची लागवड करताना शिक्षक विद्यार्थी आदी.
पिंपळगांव बसवंत : पिंपळगांव बसवंत हायस्कुलमध्ये फाली उपक्र मांतर्गत विद्यार्थ्यांना शेती व्यवसायाची माहिती व्हावी यासाठी हायस्कुल आवारात उभारलेल्या शेडनेट मध्ये मिरचीच्या रोपांची लागवड करत विद्यार्थ्यांना उत्तम शेती कशी करावी यांची माहिती देण्यात आली.
शेतीचे क्षेत्र कमी असले म्हणून खचुन न जाता तुमचे पीक नियोजन चांगले असेल आ िणसकारात्मक वृत्ती ठेवून कष्टाने सर्व साध्य करण्याची तयारी असेल, तर छोट्या क्षेत्रातूनही शेती आ िण पर्यायाने उत्तम जीवन जगता येते.
असे यावेळी किरण धोंडगे यांनी विद्यार्थांना सांगितले.
यावेळी उपमुख्याध्यापक प्रवीण पाटील, मुकुंद जाधव, नितीन डोखळे,मंदाकिनी कतवारे,सुनीता झाडे, वर्षा निकम, सीमा जगताप, शरद काळे, अमति जाधव आदी उपस्थित होते