मिरची पूड फेकून ५ लाख पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 22:18 IST2019-02-06T22:17:39+5:302019-02-06T22:18:13+5:30
मालेगाव : व्यापाऱ्याने कर्मचाºयाला भरणा करण्यासाठी दिली होती रक्कममालेगाव : शहरातील तांबाकाटा भागात राहणाºया व्यापाºयाच्या कर्मचाºयाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून ५ लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली.

मिरची पूड फेकून ५ लाख पळविले
मालेगाव : व्यापाऱ्याने कर्मचाºयाला भरणा करण्यासाठी दिली होती रक्कममालेगाव : शहरातील तांबाकाटा भागात राहणाºया व्यापाºयाच्या कर्मचाºयाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून ५ लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. सटाणानाका परिसरात मंगळवारी (दि.५) सायं. सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तुलसी फर्मच्या संचालकांनी त्यांच्या कर्मचाºयाला सटाणानाका भागातील ५ लाखांची रक्कम घेण्यासाठी पाठविले होते. सदर कर्मचारी रक्कम घेऊन येत असताना त्याच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी डोळ्यात मिरची पूड फेकून रोकड असलेली बॅग पळविली. पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.बनावट मीटर बनवून लाखोंची वीजचोरी, कनिष्ठ अभियंत्याची कारवाईमालेगाव शहरात महावितरणचे बनावट वीज मीटर बनवून वीजचोरी करणाºया यंत्रमाग कारखानदारावर कारवाई करून तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अतुल पैठणकर यांनी ही कारवाई केली. शहरातील अब्दुल हमीद अब्दुल मजीद यांचा स. नं. १५०/२, प्लॉट नं. २६ अब्दुल्लानगर येथे यंत्रमाग कारखाना असून, गेल्या सहा महिन्यांपासून महावितरणचे मीटर क्रमांक ०९२४५७५५ चे बनावट मीटर बनवून सुमारे ३२ हजार ५०१ युनिटची किंमत ३ लाख ४९ हजार रुपयांची वीजचोरी करून फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी तालुका पोलिसात अब्दुल हमीद विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.