शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

‘चिल्लर’बाज उमेदवारांना बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 01:19 IST

‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात ‘चिल्लर’च्या स्वरूपात अनामत रक्कम भरण्याचा भन्नाट प्रसंग आहे. या प्रसंगातून कलावंत मकरंद अनासपुरे यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. चित्रपटातील याच प्रसंगाची कॉपी करून अनेक स्टंटबाजांनी निवडणुकीत प्रसिद्धी मिळविली आहे.

नाशिक : ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात ‘चिल्लर’च्या स्वरूपात अनामत रक्कम भरण्याचा भन्नाट प्रसंग आहे. या प्रसंगातून कलावंत मकरंद अनासपुरे यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. चित्रपटातील याच प्रसंगाची कॉपी करून अनेक स्टंटबाजांनी निवडणुकीत प्रसिद्धी मिळविली आहे. यंदा मात्र प्रसिद्धीचा असा फंडा वापरणाऱ्यांना चाप बसू शकतो. कारण नाणे कायदा २०११ नुसार फक्त हजार रुपयांची चिल्लरच अनामत रक्कम म्हणून अधिकृत चलन ग्राह्य मानली जाते.विधानसभेची निवडणूक लढविणारे सर्वच उमेदवारीसाठी गंभीर असतात, असे नाही तर स्वत:त प्रसिद्धी मिळविण्याचा फंडा म्हणूनही निवडणुकीकडे पाहणारे अनेक नमुने असतात. अगदी अनामत रक्कम भरण्यापासून ते प्रचाररातील वेगळेपणातून ही मंडळी आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी निवडणुकीसारख्या माध्यमाचा वापर करताना दिसून येतात. यातूनच अनामत रक्कम म्हणून चिल्लर भरण्याचा फंडा वापरून प्रसिद्धी अनेकांनी माध्यमांचे लक्ष वेधून घेत मिरवून घेतले आहे. अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत अनेकांनी ‘चिल्लर’चा वापर केला. परंतु या प्रकाराला आता आळा बसणार आहे. नाणे कायमदा २०११चे कलम ६ (१) नुसार केवळ एक हजाराची चिल्लरच चलन म्हणून आहे.विधानसभेसाठी दहा हजार रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवाराला पाच हजार रुपये इतकी अनामत रक्कम जमा करावी लागते. अशावेळी अनेक उमेदवार चिल्लरच्या स्वरूपात अनामत रक्कम भरण्याची शक्यता असते. इतकी मोठी रक्कम चिल्लरच्या स्वरूपात दिल्यास संबंधित यंत्रणेचा वेळ वाया जातो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची अनामत रक्कम तुलनेत कमी असते, संबंधिताने मोठ्या रकमेत चिल्लर दिली तर यंत्रणा वेठीस धरली जाते. नाणे कायद्यामुळे या प्रकारास केवळ चापच नव्हे तर सदर प्रकार कायमस्वरूपी बंद होऊन स्टंटबाज वठणीवर येऊ शकणार आहेत.प्लॅस्टिक पिशवी वापरली तर दंडराज्यात प्लॅस्टिकला बंदी असल्यामुळे अनामत भरण्यासाठीची रक्कम प्लॅस्टिकच्या पिशवीत आणल्यास संबंधित उमेदवाराला प्लॅस्टिक वापराबद्दल दंड होऊ शकतो. नेवासा मतदारसंघात दहा हजारांची रक्कमच चिल्लरच्या स्वरूपात प्लॅस्टिकच्या पिशवीत घेऊन येणाºया स्टंटबाज कथित व्यक्तीस पाच हजारांचा दंड भरावा लागला आहे. विशेष म्हणजे हा दंड नोटांच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला. अर्थात संबंधित यंत्रणा कशाप्रकारे कारवाई करणार यावर हे अवलंबून आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय