कचरा साफ करायला सांगितले म्हणून मुलाची बापाला मारहाण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:17 IST2021-09-05T04:17:54+5:302021-09-05T04:17:54+5:30

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील खंबाळे गावठाणात गुरुवारी (दि. २) सकाळी साडेसातच्या सुमारास भगवंता किसन भोईर आपल्या अंगणात उभे असताना अंगणात ...

Child's father beaten for asking to clean up trash! | कचरा साफ करायला सांगितले म्हणून मुलाची बापाला मारहाण !

कचरा साफ करायला सांगितले म्हणून मुलाची बापाला मारहाण !

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील खंबाळे गावठाणात गुरुवारी (दि. २) सकाळी साडेसातच्या सुमारास भगवंता किसन भोईर आपल्या अंगणात उभे असताना अंगणात कचरा पडल्याचे पाहून त्यांनी आपला मुलगा सुकदेव यास कचरा खूप पडला आहे, झाडून काढ, असे सांगितले. मात्र, त्याचा राग आल्याने जवळच पडलेल्या लाकडी काठीने सुकदेवने बापाच्या डोक्यात काठीचा जोरदार प्रहार केला व मारहाण केली. या प्रकरणावरून पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

किसन भोईर (रा. खंबाळे) (६५) यांनी आरोपी मुलगा सुकदेव भगवंता भोईर याच्याविरोधात त्र्यंबक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्र्यंबक पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक केली नाही. याबाबतचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय खैरनार करीत आहेत.

Web Title: Child's father beaten for asking to clean up trash!