अंगावर सायकल पडून बालिकेचा मृत्यू

By Admin | Updated: May 18, 2017 01:03 IST2017-05-18T01:02:52+5:302017-05-18T01:03:08+5:30

अंगावर सायकल पडून बालिकेचा मृत्यू

Child's death by riding a cycle | अंगावर सायकल पडून बालिकेचा मृत्यू

अंगावर सायकल पडून बालिकेचा मृत्यू

नाशिक : एकलहरारोड भागातील भालेराव मळ्यात एका बालिकेच्या अंगावर सायकल पडून तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. कोमल गोविंद निकम (४) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. कोमल मंगळवारी (दि. १६) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घराजवळ खेळत असताना ही घटना घडली. घराजवळच स्टँडवर उभी करून ठेवलेल्या सायकलला धक्का लागल्याने सायकल तिच्या अंगावर पडली. या घटनेत कोमल गंभीर जखमी झाली. कुटुंबीयांनी तिला तत्काळ बिटको रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Web Title: Child's death by riding a cycle