मुले असणाऱ्या मुलालाच दिली वडिलांनी मालमत्ता

By Admin | Updated: April 18, 2016 00:10 IST2016-04-17T22:56:27+5:302016-04-18T00:10:48+5:30

वाळविहीर : मुली आहेत म्हणून नाकारला इस्टेटीचा हक्क

The children who have children have their own assets | मुले असणाऱ्या मुलालाच दिली वडिलांनी मालमत्ता

मुले असणाऱ्या मुलालाच दिली वडिलांनी मालमत्ता

घोटी : महिलांना समान हक्क मिळावेत यासाठी राज्यात महिला संघटना लढा देत असताना तसेच कायद्यानुसारही महिलांना सर्वत्र पन्नास टक्के आरक्षण मिळत असताना, आपल्या मुलाला फक्त मुली झाल्यात त्यामुळे त्याला आपल्या मालमत्तेचा वाटेकरी होण्याचा अधिकार नसल्याने बापाने चक्क या मुलाचा आपल्या मालमत्तेतील अधिकार नाकारला असल्याचा प्रकार इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर या आदिवासी गावात उघडकीस आला आहे.
या पित्याने आपल्या दुसऱ्या मुलाला मुले आहेत म्हणून आपल्या मालमत्तेचे मृत्यूपूर्व वाटप केले आहे. दरम्यान, जन्मदात्या पित्याने आपल्याला मालमत्तेपासून वंचित ठेवल्याचे समजताच व्यथित झालेल्या या मुलाने आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. मला फक्त मुलीच झाल्या यात माझा काय दोष, असा प्रश्न या मुलाने उपस्थित केला आहे.
दरम्यान, वडिलांनी आपल्या वडिलोपार्जित मालमत्तेचे मृत्यूपूर्व वाटप आपल्या भावाच्या नावाने केल्याची बाब येसू जोगनर यांच्या लक्षात आल्यावर त्यांना धक्काच बसला. याबाबत आपल्याला न्याय मिळावा यासाठी ते गेल्या महिनाभरापासून पोलीस ठाण्यासह महसूल कार्यालयाचे उंबरे झिजवित आहेत. दरम्यान, आपल्या वडिलांची आपल्या भावाने फसवणूक करून त्यांच्या वयाचा फायदा घेऊन हे एकतर्फी वाटपपत्र केले असल्याने हे वाटपपत्र रद्द करावे व वडिलोपार्जित मालमत्तेत आपल्याला व मुलीना हक्क मिळावा, अशी मागणी या मुलाने केली आहे.
दरम्यान, एकीकडे शासन स्त्री-पुरु ष समानतेसाठी प्रयत्न करीत असताना, ग्रामीण भागात मात्र अजूनही या बाबीचा प्रसार आणि प्रबोधन झाले नसल्याने आजही स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जात आहे व त्यांना त्यांच्या अधिकारापासून डावलले जात आहे. केवळ मुली असल्याने त्यांना वडिलोपार्जित मालमत्तेतील अधिकारापासून वंचित ठेवले जात असल्याची बाब समोर आल्याने तालुक्यातील महिला संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. (वार्ताहर)

Web Title: The children who have children have their own assets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.