‘त्या’ दारुपार्टीत अधिकाऱ्यांची मुले सहभागी!
By Admin | Updated: March 30, 2017 04:01 IST2017-03-30T04:01:18+5:302017-03-30T04:01:18+5:30
इगतपुरीजवळील मिस्टिक व्हॅली येथील बॅचलर दारूपार्टीत बारबाला व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मुले सहभागी झाल्याची

‘त्या’ दारुपार्टीत अधिकाऱ्यांची मुले सहभागी!
नाशिक : इगतपुरीजवळील मिस्टिक व्हॅली येथील बॅचलर दारूपार्टीत बारबाला व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मुले सहभागी झाल्याची खात्रीशीर माहिती असून बांधकाम विभागातील अधिकारी तसेच आयएएस अधिकाऱ्यांची मुले तसेच आयपीएस अधिकाऱ्याच्या जावयाचा त्यात समावेश असल्याची माहिती हाती आली आहे.
नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडलेले व कोट्यवधींची संपत्ती जप्त करून अपसंपदेचा गुन्हा दाखल असलेल्या मुख्य अभियंत्यासोबत काम केलेल्या दोन अधिकाऱ्यांची मुले, औरंगाबादच्या एका व पुणे येथील दोन अधिकाऱ्यांची मुले, नंदुरबारच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा भाऊ तसेच नाशिक परिक्षेत्रात कर्तव्य बजावलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या जावयाचाही या पार्टीत होता़, अशी माहिती मिळाली आहे. मुंबईतील बारबाला आणि डान्सबार मालकांच्या फिस्कटलेल्या आर्थिक व्यवहारामुळे या दारूपार्टीचे बिंग फुटले. पोलिसांनी बुधवारी घटनास्थळावरून आणखी एक संशयास्पद कार ताब्यात घेतली आहे. युवकांनी मुंबईतील बारबालांशी संपर्क साधत पार्टी निश्चित केली. त्यांच्या एका मित्राचा विवाह ठरल्याबद्दल ही पार्टी आयोजित केल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)
अहवालाची प्रतीक्षा
युवक व बारबालांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्यांनी मद्यप्राशन केले होते की, अमली पदार्थांचे सेवन, याचा उलगडा होणार आहे.