वीज पडून बालक ठार
By Admin | Updated: May 29, 2014 16:30 IST2014-05-28T23:59:05+5:302014-05-29T16:30:00+5:30
अचानक सोसाट्याचा वारा व पाऊस होऊन यावेळी वीज पडून साडेचार वर्षाचा बालक ठार झाला तर चार जण जखमी झाले.

वीज पडून बालक ठार
वडाळीभोई -चांदवड तालुक्यातील कानमंडाळे, कुंडाणे शिवारात अचानक सोसाट्याचा वारा व पाऊस होऊन यावेळी वीज पडून साडेचार वर्षाचा बालक ठार झाला तर चार जण जखमी झाले. यावेळी वीज पडली त्यात गोंविद पुंडलिक घडोजे (४.५ वर्षे) याचे अंगावर वीज पडून तो जागीच ठार झाला तर पुजा निवृत्ती घडोजे (११ ) ही गंभीर भाजली गेली. अन्य तीघांमध्ये जयश्री निवृत्ती घडोजे (८), राजश्री पुंडलिक घडोेजे (११), कल्पना बाळु घडोजे (८), सर्व रा.राधाकृष्ण वस्ती कानमंडाळे हे जखमी झाले आहेत.