बालमृत्यूप्रकरणी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:58 IST2017-09-14T00:57:21+5:302017-09-14T00:58:21+5:30
राष्टÑवादी महिला कॉँग्रेसची निदर्शने : कुपोषण कमी करण्याची मागणी नाशिक : न्यायाची अपेक्षा करतेय आई, मूल वाचवा, दत्तक नाशिक वाºयावर, शासनाचा निषेध असे फलक घेऊन राष्टÑवादी कॉँग्रसेच्या महिला पदाधिकाºयांनी हातात नवजात बाळांच्या प्रतिमा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

बालमृत्यूप्रकरणी मोर्चा
राष्टÑवादी महिला कॉँग्रेसची निदर्शने : कुपोषण कमी करण्याची मागणी
नाशिक : न्यायाची अपेक्षा करतेय आई, मूल वाचवा, दत्तक नाशिक वाºयावर, शासनाचा निषेध असे फलक घेऊन राष्टÑवादी कॉँग्रसेच्या महिला पदाधिकाºयांनी हातात नवजात बाळांच्या प्रतिमा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
दरम्यान, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा न झाल्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेस तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी पदाधिकाºयांनी दिला. राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला होता. जिल्हा रु ग्णालयातील नवजात अर्भक मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी दोन दिवसांपूर्वीच नाशिकला भेट देत राज्य सरकारवर टीका केल्यानंतर बुधवारी (दि. १३) जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता.
तालुकावार असलेले सरकारी दवाखाने, महानगरपालिकेचे दवाखाने यातही पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य रुग्णास वैद्यकीय सेवा मिळत नाही. तसेच स्वाइन फ्लू, डेंग्यू व अन्य साथींनी जिल्ह्यात थैमान घातल्याने त्यावरील लसी व औषधसाठा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणीही डॉ. पवार यांनी यावेळी केली.
आंदोलनात युवती जिल्हाध्यक्ष प्रतीक्षा बिल्लाडे, नगरसेवक सुषमा पगारे, समीना मेमन, शोभा साबळे, अनिता भामरे, माधुरी गायधनी, योगिता आवारे, अपर्णा देशमुख, मेघा दराडे, सायरा शेख, अर्चना परछा, पूनम बर्वे, मंजूषा महेश, पूनम शहा, पुष्पा सहारे, कमल सोनवणे, सरला गायकवाड, मनीषा गाडेकर, मंदा आव्हाड, विनता सिंग, अर्चना आव्हाड, आफरिन सय्यद, संगीता कंगना, उज्ज्वला गायकवाड, नैना भालेराव, रूप गीत, कोमल निकाळे, अंकिता पवार, गायत्री झांजरे, काजल बोदंडे, पूजा कर्डक, राधा कुटे, कोमल शिंदे, वैशाली आहिरे, प्रियंका मानधने आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.पालकमंत्री फिरकले नसल्याने नाराजीकुपोषित, नवजात व मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांसाठी आवश्यक असलेले फक्त १८ इन्क्युबेटर मशीन्स उपलब्ध असून, प्रत्यक्षात आता तेथे ४२ बालके ठेवलेली आहेत. त्यामुळे बालके दगावण्याचाच धोका जास्त आहे. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही जिल्ह्याचे पालकमंत्री फिरकले नसल्याने जिल्हाध्यक्ष बलकवडे यांनी नाराजी व्यक्त केली.