कोरोनाकाळात बालविवाह वाढले; विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:27+5:302021-07-22T04:10:27+5:30
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासूनच कोरोनामुळे लॉकडाऊन व सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले गेले आहेत. अशा परिस्थितीत पालकांच्या मते उपवर ...

कोरोनाकाळात बालविवाह वाढले; विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र !
गेल्या वर्षी मार्च महिन्यापासूनच कोरोनामुळे लॉकडाऊन व सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लादले गेले आहेत. अशा परिस्थितीत पालकांच्या मते उपवर झालेल्या मुलींचे मोजक्याच नातेवाईकांसमक्ष लग्न लावून देण्याचे प्रकार घडले आहेत. वयाची सोळा वा सतरा वर्षे कशीबशी पूर्ण केलेल्या मुलींचे लग्न लावून देण्यात आले असून, यातील काही लग्ने समाजाच्या समयसूचकतेने वेळीच रोखण्यात आली आहेत.
------------
पटसंख्येचा निश्चित आकडा काढणे कठीण
कोरोनाचे निर्बंध पाहता शासनाने कोरोनामुक्त गावांमध्येच शाळा उघडण्यास अनुमती दिली असल्यामुळे नाशिक जिल्ह्यात कोरोनामुक्त ३५५ गावांपैकी २०८ शाळा सुरू झाल्या आहेत. त्यातही फक्त ५० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आल्याने या शाळांमधील पटसंख्या काढणे शिक्षण विभागाला मुश्किल झाले आहे.
------
२०८ शाळा सुरू
१०१४ शाळा अद्यापही बंद
--------
एकूण हजेरी- ८,९२७
मुले- ५,०२३
मुली- ३,९०४
---------------
अल्पवयात मुली, मुलांचे लग्न लावणे कायद्याने गुन्हा आहे. असे लग्न लागत असेल तर महिला बालविकास विभाग, चाईल्डलाईन किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी. त्याची त्वरित दखल घेतली जाईल.
- सुरेखा पाटील, महिला व बालकल्याण अधिकारी
----------
दहावीच्या विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र
* नाशिक जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांत बाल विवाहाच्या २२ घटना घडल्या आहेत. या लग्नाच्या तक्रारी झाल्याने त्याची दखल घेण्यात आली.
* बालविवाह करणाऱ्या कुटुंबीयांना समज देण्यात आली. त्यात ४ कुटुंबांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-----------------
उपवर वय व आर्थिक विवंचना हेच कारण
* ग्रामीण भागात मुलींचे वाढलेले वय हेच कुटुंबासाठी काळजीचे कारण. त्यातही चांगल्या स्थळाला पसंती
* कमी वयातही लग्न करण्याची तयारी, आर्थिक विवंचनेमुळे लवकर लग्नाची घाई केली जाते.
--------------
अज्ञान, गरिबी व चालीरितीमुळे ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींचे लग्न लावण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ते त्या मुलींसाठी व सामाजिक समतोल राखण्यास घातक ठरू शकते. ते टाळण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे.
- शोभा पवार, सामाजिक कार्यकर्त्या