लखमापूरला बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:20 IST2017-09-22T01:20:18+5:302017-09-22T01:20:42+5:30

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील मेगा फाइन कंपनीजवळ नरभक्षक बिबट्याने गुरुवारी बालकाचा बळी घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Child killed in Lakhmapur attack | लखमापूरला बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार

लखमापूरला बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील मेगा फाइन कंपनीजवळ नरभक्षक बिबट्याने गुरुवारी बालकाचा बळी घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लखमापूर येथील विनायक बिंड (८) या मुलावर बिबट्याने हल्ला केला. लखमापूर गावातील मेगाफाईन कंपनीजवळ वास्तव्यास असणाºया दत्तात्रय वाघ यांच्या मळ्यात शेतमजूर म्हणून काम करणाºया बिंड दाम्पत्याचा मुलगा विनायक त्याच्या मित्रासह घराजवळ खेळत होता. यावेळी उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करत विनायकला उसाच्या शेतात ओढून नेले. हे दृश्य पाहताच विनायक याच्या आईने आरडाओरड करताच जमलेल्या शेतमजुरांनी विनायक याला बिबट्याच्या तावडीतून सोडविले. त्याला तातडीने रिक्षाचालक राहुल चव्हाण यांनी दिंडोरी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

Web Title: Child killed in Lakhmapur attack