बालकास अमानुष मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 22:14 IST2017-10-08T22:14:04+5:302017-10-08T22:14:28+5:30

मालेगाव : भूतबाधा उतरविण्यासाठी कृत्यमालेगाव : म्हाळदे शिवारातील अझरूद्दिन ऐनुद्दिन शेख यास भूतबाधा झाली आहे असे सांगून ते उतरविण्यासाठी मारहाण करीत नरबळी देण्याचा प्रयत्न करणाºया साबुद्दिन कुतूबुद्दिन व बाबा रफिक अन्सारी या दोघांना पवारवाडी पोलिसांनी शनिवारी रात्री साडेदहा वाजता अटक केली. इब्राहिमनगरमधील शेख ऐनुद्दिन कुतूबुद्दिन (४२) यांनी फिर्याद दिली. गुरुवारी (दि. ५) म्हाळदे शिवारात दुपारी १२ वाजेपूर्वी ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

 Child Inhuman Inhuman | बालकास अमानुष मारहाण

बालकास अमानुष मारहाण

मालेगाव : भूतबाधा उतरविण्यासाठी कृत्यमालेगाव : म्हाळदे शिवारातील अझरूद्दिन ऐनुद्दिन शेख यास भूतबाधा झाली आहे असे सांगून ते उतरविण्यासाठी मारहाण करीत नरबळी देण्याचा प्रयत्न करणाºया साबुद्दिन कुतूबुद्दिन व बाबा रफिक अन्सारी या दोघांना पवारवाडी पोलिसांनी शनिवारी रात्री साडेदहा वाजता अटक केली.
इब्राहिमनगरमधील शेख ऐनुद्दिन कुतूबुद्दिन (४२) यांनी फिर्याद दिली. गुरुवारी (दि. ५) म्हाळदे शिवारात दुपारी १२ वाजेपूर्वी ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शेख साबुद्दिन कुतूबुद्दिन, यास्मीन साबुद्दिन शेख व बाबा रफीक अन्सारी (पूर्ण नाव माहीत नाही), बाबा रफीकची पत्नी (नाव माहीत नाही) यांनी मुलास मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
संशयित आरोपींनी संगनमताने फिर्यादीचा मुलगा अझरूद्दिन यास भूतबाधा झाली आहे असल्याचे सांगितले. यासाठी त्याची भूतबाधा उतरविण्यासाठी कानात, तोंडात व अंगावर तेल लावून हातात व गळ्यात गंडे, तोडे बांधून त्यास मारहाण व अघोरी विद्या केली म्हणून महाराष्टÑ नरबळी आणि इतर अमानुष व अनिष्ट प्रकार, जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Child Inhuman Inhuman