बंधाऱ्यात बुडून बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 01:33 IST2021-10-02T01:32:58+5:302021-10-02T01:33:55+5:30
नागझिरा बंधाऱ्यात बुडालेल्या सातवर्षीय चिमुकल्याला वाचविण्याचे प्रयत्न असफल ठले. जिल्हा आपत्तीचे जवान आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करूनही त्यांना यश येऊ शकले नाही. सुमारे सात तासांनंतर त्याचा मृतदेह हाती लागला.

बंधाऱ्यात बुडून बालकाचा मृत्यू
नाशिक : नागझिरा बंधाऱ्यात बुडालेल्या सातवर्षीय चिमुकल्याला वाचविण्याचे प्रयत्न असफल ठले. जिल्हा आपत्तीचे जवान आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करूनही त्यांना यश येऊ शकले नाही. सुमारे सात तासांनंतर त्याचा मृतदेह हाती लागला. नांदगाव तालुक्यातील मौजे करी येथील रिहान अनिल काकड हा सातवर्षीय चिमुकला दुपारी तीन वाजेच्या सुमारास नागझिरा बंधाऱ्यात बुडाला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यास वाचविण्याचे प्रयत्न करण्यात आले. रात्रीदेखील त्याचा शोध सुरूच होता. रात्री साडेदहा वाजता त्याचा मृतदेह हाती लागला.