घोटीत कुपोषमुक्तीसाठी बालविकास केंद्राला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 02:22 PM2019-07-18T14:22:34+5:302019-07-18T14:23:11+5:30

घोटी : बालकांच्या कुपोषणमुक्तीसाठी शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पामार्फत विविध योजना राबवल्या जातात. सदृढ बालके ही देशाची मोठी संपत्ती आहे. सजगतेने विविध योजनांचा परिणामकारक लाभ घ्यावा असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र पवार यांनी केले.

Child Development Center started for Dehydration | घोटीत कुपोषमुक्तीसाठी बालविकास केंद्राला प्रारंभ

घोटीत कुपोषमुक्तीसाठी बालविकास केंद्राला प्रारंभ

Next

घोटी : बालकांच्या कुपोषणमुक्तीसाठी शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पामार्फत विविध योजना राबवल्या जातात. सदृढ बालके ही देशाची मोठी संपत्ती आहे. सजगतेने विविध योजनांचा परिणामकारक लाभ घ्यावा असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र पवार यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र काननवाडी अंतर्गत उपकेंद्र घोटी येथे कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी बाल विकास केंद्राचे उदघाटन करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की काननवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात बहुतांशी कुपोषण हद्दपार झालेले आहे. याचा अभिमान वाटत असल्याचे ते शेवटी म्हणाले. घोटीतील रामरावनगर, सप्तशृंगी नगर, संभाजी नगर, श्रमीकनगर येथे अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले. ग्राम बाल विकास केंद्राचे उदघाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कुपोषणावर मात करण्यासाठी पूरक पोषण आहार देणे आणि वेळीच आवश्यक आरोग्य सेवा पुरविणे या दोन्ही महत्वाच्या बाबी आहेत. किंबहुना पूरक पोषण आणि आरोग्य सेवा या दोन्ही एकित्रतपणे आण िसमन्वयाने पुरविल्या तरच हा प्रश्न सोडविता येईल असे विजय नाना सोपे यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले. यावेळी साहेबराव काटकर,संध्या देशमुख, कल्पना इंदरखे, दुर्गा भालेराव, शिरसाठ , वंदना कुंदे, चुंबळे, आशा गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका,मदतनीस उपस्थित होते.

Web Title: Child Development Center started for Dehydration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक