राजापूर येथे चिकूची बाग करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 05:38 PM2019-05-27T17:38:49+5:302019-05-27T17:39:23+5:30
येवला तालूक्यातील राजापूर येथे यंदाच्या दुष्काळी परिस्थितीने येवला नांदगाव रोडला असलेल्या चिकुची बाग पाण्यावाचून वाळून गेली आहे. येथील शेतकरी सुरेश पांडुरंग अलगट यांनी मोठ्या कष्टाने चिकुची बाग फुलवली होती. माञ निसर्गाने हुलकाहुनी दिल्याने हि बाग पाण्यावाचून चिकूची झाडे पाण्याअभावी वाळली आहे.
राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे यंदाच्या दुष्काळी परिस्थितीने येवला नांदगाव रोडला असलेल्या चिकुची बाग पाण्यावाचून वाळून गेली आहे. येथील शेतकरी सुरेश पांडुरंग अलगट यांनी मोठ्या कष्टाने चिकुची बाग फुलवली होती. माञ निसर्गाने हुलकाहुनी दिल्याने हि बाग पाण्यावाचून चिकूची झाडे पाण्याअभावी वाळली आहे. या शेतकर्याने आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर मेहनत करून हि चिकूची बागेची उभारणी केली होती सुरेश अलगट यांनी या चिकूच्या बागेत शेती केलेली आहे. हिच बाग पावसाळ्यात रस्त्याने जाताना हिरव्या गार झाडे दिसायची माञ दुष्काळी परिस्थितीचा फटका बसल्याने शेतकरी हवालिदल झाला आहे. इथूनमागे पाच ते सहा वर्षात पावसाळ्याचे प्रमाण हे कमी कमी झाले, त्यामुळे या विहिरीवर दुसरे बागायत न करता या बागेसाठी पाणी साठवून ठेवून आतापर्यंत बाग मोठी केली होती, पण शेवटी यावषीॅ पिण्यासाठी पाणी मिळत नाही व बागेसाठी पाणी आणणे हे अवघड झाले होते. अखेर बागेचे नुकसान झाले आहे. यावषीॅ पाण्याअभावी अनेक ठिकाणी बागा जळून गेल्या आहे.