चिखलओहोळच्या गुरुजींची नृत्य-संगीताची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:07+5:302021-09-26T04:15:07+5:30
सोयगाव : शिक्षकी पेशा म्हटला की घर आणि आपली शाळा असा दिनक्रम आखून घेतलेली माणसं नजरेसमोर येतात. परंतु काही ...

चिखलओहोळच्या गुरुजींची नृत्य-संगीताची शाळा
सोयगाव : शिक्षकी पेशा म्हटला की घर आणि आपली शाळा असा दिनक्रम आखून घेतलेली माणसं नजरेसमोर येतात. परंतु काही शिक्षक या चौकटीबाहेरचंही जग जगतात आणि जिंकतातही. मालेगाव तालुक्यातील चिखलओहोळ येथील माध्यमिक शिक्षक समीर जीवरक यांचीही अशीच हटके कहाणी आहे. जीवरक हे केवळ पुस्तकी ज्ञान विद्यार्थ्यांना देत नाहीत तर संगीत,नृत्य, अभिनय या कलेतही पारंगत करत असतात. त्यामुळे परिसरात त्यांना हिरो या नावानेच ओळखले जाते. मराठी विषयातील धडे आणि कविता जिवंत करून शिकवणारे, मायकल जॅक्सनपासून भारतीय डान्सर रेमोच्या स्टेप्स हुबेहूब साकारणारे, विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाबरोबरच नृत्य, अभिनयाचे धडे गिरवून घेतानाच देहभान विसरून विद्यार्थ्यांना शिकवणारे समीर जीवरक ही सर्वांना परिचित असली तरी प्रसिद्धीपासून मात्र कोसो दूर आहे. अष्टपैलू शिक्षक असलेले जीवरक मराठी विषयाच्या अध्यापनाबरोबरच नृत्य, कला, अभिनय, संगीत वाद्य वाजविण्यातही त्यांचा हातखंडा आहे. शाळेतील कोणत्याही कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ही त्याच्या नुसत्या असण्याने हसमुख, सदाबहार होणार शिवाय कला शिक्षक रजेवर असल्यास उत्तम, असे फलक लेखनही करणार. शाळेबरोबरच स्वतःच्या कॉलनीत सांस्कृतिक कार्यक्रमाची धुराही सांभाळतात, त्यामुळे त्यांच्या कॉलनीतील हिरो म्हणून त्यांना मित्रपरिवाराने दिलेली उपाधी त्यांच्या डाउन-टू-अर्थ वागण्याने सार्थकी ठरली आहे.
विद्यार्थी घडवताना खरं तर शिक्षक स्वतःलाही घडवत असतो. त्या दृष्टीने आजन्म विद्यार्थी असणं ही खऱ्या शिक्षकाची ओळख असते. वर्गात विद्यार्थी सक्रिय कसे राहतील, त्यांच्यातील नकारात्मक भावना दूर होऊन सकारात्मक दृष्टिकोनातून ते जीवनाकडे कसे पाहतील, या दृष्टीनं प्रयत्न करणं, ही त्यांची शाळेत रुजू झाल्यापासूनची भूमिका आजही कायम आहे.
विद्यार्थ्यांनाबरोबरच पालकांशी ही सलोख्याचे संबंध जपत अडीअडचणी समजून मोलाचे मार्गदर्शन करत असतात.
शाळेतील किंवा त्यांच्या वर्गातील विद्यार्थी आजारी आहे हे समजल्यावर स्वतः विद्यार्थ्यांना स्वखर्चाने दवाखान्यात नेणार व घरी नेऊन सोडणार. पुरस्कारापासून स्वतः ला लांब ठेवणार. खऱ्या शिक्षकाचा पुरस्कार फक्त विद्यार्थीच देऊ शकतात आणि मी अजून त्यासाठी लायक नाही, असे नम्रपणाही त्यांच्या अंगी भिनलेला आहे. केवळ माहिती देणं, पुस्तक शिकवणं, परीक्षा घेणं आणि मूल्यमापन करणं एवढीच जबाबदारी न स्वीकारता, मूळ ज्ञानस्त्रोतापर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे, समकालीन वास्तव समजून घेत प्रश्नांची ओळख करून देत योग्य किंवा अयोग्य काय, याची शहानिशा करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारा शिक्षक म्हणून समीर जीवरकक्ष यांच्याकडे बघितले जाते.
फोटो- २३चिखलओहोळ गुरूजी
230921\571323nsk_45_23092021_13.jpg
फोटो- २३चिखलओहोळ गुरूजी