शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्री बदलाचीचर्चा : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:50 AM

सरकारला शेतीसह उद्योग, क्षेत्रात विकासाची कामे करता आली नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यातूनच आरक्षणाच्या मागण्यांसाठी तरुण रस्त्यावर उतरत आहेत. भाजपा अपयशी ठरल्याने सरकारचे अपयश झाकण्याठीच मुख्यमंत्री बदलाची चर्चा होत असल्याचे सांगताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य व केंद्रातील भाजपा सरकारवर टीकेची झोड उठविली.

नाशिक : सरकारला शेतीसह उद्योग, क्षेत्रात विकासाची कामे करता आली नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. त्यातूनच आरक्षणाच्या मागण्यांसाठी तरुण रस्त्यावर उतरत आहेत. भाजपा अपयशी ठरल्याने सरकारचे अपयश झाकण्याठीच मुख्यमंत्री बदलाची चर्चा होत असल्याचे सांगताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य व केंद्रातील भाजपा सरकारवर टीकेची झोड उठविली.शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे रविवारी (दि. १२) कार्यकर्ता मेळाव्यात पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. व्यासपीठावर माजीमंत्री शोभा बच्छाव, शरद आहेर, मविप्रचे डॉ. तुषार शेवाळे, शाहू खैरे, हेमलता पाटील, वत्सला खैरे, राजेंद्र बागुल उपस्थित होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट राज्यात व केंद्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप केले. (पान ५ वर)देशातील नाशिकसह बंगळुरू, कोरापूट, कोरवा आदी सार्वजनिक क्षेत्रातील विमान निर्मिती करणाऱ्या कारखान्यांना डावलून संरक्षण क्षेत्रातील कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला विमान निर्मितीचे काम देण्यात आले. विशेष म्हणजे यूपीए सरकारने ५७० कोटी रुपयांना एक राफेल विमान खरेदीचा व्यवहार केलेला असताना केंद्र सरकारने त्याच विमानाची खरेदी करताना एका राफेल विमानासाठी जवळपास १६७० कोटी रुपये मोजून प्रत्येक विमानामागे सुमारे एक हजार कोटी रुपये अधिक दिले आहेत. त्यामुळे ३६ विमानांच्या खरेदीत ३६ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, हा संरक्षण क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्याचप्रमाणे सरकारने शेतीविषयक चुकीचे आयात-निर्यात धोरण राबवून शेतीमालाचे भाव पाडल्याने शेतकºयांना रस्त्यावर उतरावे लागले. तसेच तरुणांना नोकºया देण्याचे खोटे आश्वासने देऊन सत्ता प्राप्त केल्यानंतर नोटबंदी आणि जीएसटीसारखे निर्णय घेऊन त्यांची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केली. त्यामुळे उद्योग, व्यवसाय क्षेत्रात त्याचा विपरीत परिणाम होऊन तरुणांना नवीन नोकºया मिळण्याऐवजी आहे त्याही नोकºया संकटात आल्याने तरुणांनाही रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याची टीका चव्हाण यांनी केली. मराठा, मुस्लीम आरक्षण काँग्रेसनेच दिलेतरुणांना नोकºया देण्याचे आश्वासन देऊन भाजपाचे सरकार सत्तेवर आले. मात्र, सरकारला नोकºयांची निर्मिती करण्यात अपयश आले. त्यामुळेच तरुण रस्त्यावर उतरत आहे. मराठा व मुस्लीम समाजाला काँग्रेस सरकारनेच आरक्षण दिले आहे. परंतु, नोकºयांची निर्मितीच होत नसल्याने आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून, आरक्षणासाठी मराठा समाजासोबतच मुस्लीम आणि धनगर समाजही रस्त्यावर उतरण्यास हीच परिस्थिती कारणीभूत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाटराज्य सरकारने समृद्धी महामार्ग आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या परिसरातील जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट घातला असून, या प्रकल्पांना मंजुरी मिळण्यापूर्वीच मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाºयांनी समृद्धी महामार्ग आणि बुलेट ट्रेन मार्गाच्या परिसरात जमिनी घेतल्या असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. प्रकाश मेहता, अमित शाह यांचे पुत्र जय यांच्या विरोधात चौकशीची मागणी होत असताना सरकार कोणतीही कारवाई करीत नसल्याचे त्यांनी सांगितले.नोकºयाच नाहीत, गडकरी खरे बोललेदेशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे, मात्र पंतत्रप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने तरुणांना नोकºया दिल्याचे सांगतात. मुख्यमंत्रीही मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र यासारख्या घोषणा करून राज्यात गुंतवणूक येत असल्याचे सांगतात. परंतु, राज्यात किती गुंतवणूक आली, किती नोकºया दिल्या, कोणते उद्योग सुरू झाले, कोणत्या भागात उद्योग आले याविषयी कोणतीही माहिती दिली जात नाही. प्रत्यक्षात राज्यासह देशात कुठेही नोकºया मिळत नाहीत, ही वास्तविकता नितीन गडकरी यांनी मान्य केली असून, यासंबंधी ते खरे बोलल्याचेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.राहुल गांधींनी संसदेतून केला शंखनादवर्षभरात सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित होणार की उशिरा होणार याविषयी सध्या राज्यात संभ्रमावस्था आहे. केंद्र सरकारचा कार्यकाळ संपला असून, त्यांना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आले आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत केंद्र सरकार विरोधातील अविश्वास ठरावात सरकारला उघडे पाडत येणाºया लोकसभा निवडणुकांचा शंखनाद केल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. नरेंद्र मोदींचे सरकार हटविण्यासाठी देशातील लोकशाहीत विश्वास असणारे सर्व पक्ष एकत्रित येत असल्याचे सांगतानाच त्यांनी कार्यकर्त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या कामाला लागण्याच्या सूचना केल्या.इन्फो-४इन्फो-पक्षातील गटतट चव्हाट्यावरनाशिक शहरासह जिल्हा काँग्रेसमधील गटतटाचे राजकारण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. पक्षाचे प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री शहरात पक्षाच्या विद्यार्थी गुणगौरव व कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असताना जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. याविषयी पक्षातील नेत्यांना विचारणा केली असता बहुतेक जण बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, या पदाधिकाºयांचे प्रतिनिधीही बैठकीला उपस्थित नसल्यामुळे कार्यक्रमात कार्यकर्त्यांपेक्षा स्टेजवरील नेत्यांचीत संख्या अधिक दिसून आली. यापूर्वी एनएसयूआयच्या गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून आमदार निर्मला गावित व माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचा गट एकत्र आला असताना डॉ. शोभा बच्छाव, डॉ हेमलता पाटील, शहराध्यक्ष शरद अहेर यांच्या गटाने त्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती.इन्फोनोटबंदीपूर्वी भाजपने पैसा परदेशात पाठवलाभाजपने नोटबंदी करण्यापूर्वीच आपला पैसा परदेशात पाठवून तसेच विविध ठिकाणी गुंतवून नोंटबंदीनंतर पुन्हा तो पक्षाक डे वळवला, तर विरोधी पक्षांचे मात्र या माध्यमातून खच्चीकरण केल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच भाजापा सरकार सत्तेत येण्यापूर्वी ५० लाख रुपयांपर्यंत उलाढाल असलेली अमिशा यांच्या मुलाची कंपनी ८० कोटींपर्यंत कशी पोहचली असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.(फोटो-१२पीएचएयू६८)- नाशिक काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. व्यासपीठावर हनिफ बशीर, रईस शेख, राजेंद्र बागुल, शाहू खैरे, शोभा बच्छाव, शरद अहेर, हेमलता पाटील, डॉ. तुषार शेवाळे आदी.

 

टॅग्स :PoliticsराजकारणPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण