त्र्यंबक देवस्थानतर्फे ५१ लाखांचा मुख्यमंत्री सहायता निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 16:28 IST2020-03-31T16:27:14+5:302020-03-31T16:28:13+5:30

येथील देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोरोनाचा सामना करण्यासाठी ५१ लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तहसीलदार दिपक गिरासे यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला.

 Chief Minister's Assistance Fund of Rs | त्र्यंबक देवस्थानतर्फे ५१ लाखांचा मुख्यमंत्री सहायता निधी

त्र्यंबक देवस्थानतर्फे ५१ लाखांचा मुख्यमंत्री सहायता निधी

त्र्यंबकेश्वर : येथील देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोरोनाचा सामना करण्यासाठी ५१ लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तहसीलदार दिपक गिरासे यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला.
राज्यावर आलेल्या कोरोना विषाणूचे संकट परतावून लावण्याकामी हातभार लावण्यासाठी नुकतीच आठ विश्वस्तांची संमती घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ लाख रूपये देण्याचे निश्चित करण्यात आले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष न्या. एस. एम. बोधनकर यांच्या अभिप्रायाने व त्यांच्याच स्वाक्षरीने ५१ लाख रु पयांचा धनादेश सोमवारी सायंकाळी तहसीलदार गिरासे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी विश्वस्त प्रशांत गायधनी, संतोष कदम, पंकज भुतडा, महिला विश्वस्त तृप्ती धारणे उपस्थित होते.

Web Title:  Chief Minister's Assistance Fund of Rs