शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले, गृहमंत्र्यांकडून नाशिक दुर्घटनेबाबत शोक व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 19:54 IST

या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत

ठळक मुद्देया दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच राज्य शासनामार्फत मृताच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे

मुंबई - राज्यामध्ये कोरोनाच्या संकटाशी समर्थपणे लढा दिला जात असतांना नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला. ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे सांगत, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच, मृतांच्या नातेवाईकांप्रती सांत्वना व्यक्त केली आहे. 

या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच राज्य शासनामार्फत मृताच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. यापुढे राज्यात अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडू नये याची काळजी सर्व संबंधितांनी घ्यावी, असे त्यांनी म्हटले. तसेच सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरक्षित व सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घेणे आवश्यक आहे असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.

शरद पवारांनीही वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'नाशिक येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात अतिशय दुर्दैवी घटनेत रुग्णांना प्राणांस मुकावे लागले. ही दुर्घटना सद्यस्थितीत वैद्यकीय यंत्रणेसाठी वेदनादायी आणि आव्हानं वाढवणारी आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहवेदना. भावपूर्ण श्रद्धांजली.', असे ट्विट पवार यांनी केलंय. 

राज ठाकरेंकडूनही शोक व्यक्त

नाशिकच्या दुर्घटनेवर भाष्य करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं अशी मागणी त्यांनी केली आहे. 

 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलcorona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकNashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळती