मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 01:05 IST2018-10-04T01:03:45+5:302018-10-04T01:05:05+5:30

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Chief Minister Fadnavis tomorrow in Nashik | मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशकात

मुख्यमंत्री फडणवीस उद्या नाशकात

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांच्या दौºयामुळे शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (दि. ५) जिल्हा दौºयावर येत आहे. नाशिक विभागाच्या कामकाजाचा आढावा तसेच येथील महाराष्टÑ पोलीस अकादमीच्या दीक्षांत संचलन समारोहास ते उपस्थित राहणार आहेत.  मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी जानोरी येथे भेट दिल्याने एका आठवड्यात दुसºयांदा मुख्यमंत्री नाशिक भेटीवर आले आहेत. शुक्रवारी सकाळी आठ वाजता विशेष विमानाने ओझर येथे मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार असून, त्यानंतर ते थेट पोलीस अकादमीच्या कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर नाशिकरोड विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात होणाºया आढावा बैठकीस उपस्थित राहतील. मुख्यमंत्र्यांसोबत नाशिक दौºयावर येणारे चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन यांच्या हस्ते मराठा समाज विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येणाºया वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौºयामुळे शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे.

Web Title: Chief Minister Fadnavis tomorrow in Nashik