मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशकात दाखल

By संजय पाठक | Updated: October 21, 2022 11:11 IST2022-10-21T11:10:41+5:302022-10-21T11:11:36+5:30

नाशिक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले असून यावेळी  राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ...

Chief Minister Eknath Shinde reached in Nashik | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशकात दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशकात दाखल

नाशिक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले असून यावेळी  राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे,  महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार,पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे, निफाड प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे  यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत केले.
नाशिक साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ, सारथी विभागीय कार्यालय उद्घाटन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Chief Minister Eknath Shinde reached in Nashik