मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशकात

By Admin | Updated: May 22, 2015 01:17 IST2015-05-22T01:17:26+5:302015-05-22T01:17:58+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशकात

Chief Minister Devendra Fadnavis today in Nashik | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशकात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशकात

  नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्यासमवेत वित्तमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश महाजन असणार आहेत. शुक्रवार (दि. २२) रोजी सकाळी १० वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने नाशिकला प्रयाण, १०.५० वाजता किशोर सूर्यवंशी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल मैदान, मानोरी येथे त्यांचे आगमन होणार आहे. ११ वाजता ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत. १२.३० भोजनासाठी राखीव वेळ असून, दुपारी १ वाजता लघुउद्योग भारतीच्या प्रदेश अधिवेशनासाठी ते रवाना होणार आहेत. १.३० वाजता ते या अधिवेशनास उपस्थित राहणार असून, दुपारी २.३० वाजता पोलीस परेड ग्राउंड येथील हेलिपॅडवरून ते कोल्हापूरकडे प्रयाण करणार आहेत.

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis today in Nashik