मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा तोरंगणला मुक्काम

By Admin | Updated: August 12, 2014 01:17 IST2014-08-11T21:05:40+5:302014-08-12T01:17:53+5:30

मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा तोरंगणला मुक्काम

Chief executive officer's stay at Torangan | मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा तोरंगणला मुक्काम

मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा तोरंगणला मुक्काम

 हरसूल : हरसूलजवळील तोरंगण या लहानशा खेड्यात सायंकाळी अचानक लाल दिव्याची गाडी येऊन थांबली. हनुमान मंदिराच्या ओट्यावर बसलेल्या गावातील शेतकरी, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणांसोबत सहज चर्चा करायची आहे, असे सांगत गाडीमधील साहेबांनी गावाच्या समस्यांना हात घालत साऱ्यांना बोलते केले. गप्पा सुरूझाल्यावर अचानक त्यांच्या पाठीमागून शासकीय वाहने व शासकीय कर्मचारी गावात येऊ लागले. थोड्याच वेळात ग्रामसेवक व सरपंच तसेच ग्रामस्थांना जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी सुखदेव बनकर आपल्या गावात भेटीला आले आहे याचा उलगडा झाला. मंदिर परिसरात गर्दी आणखी वाढली. बनकर यांनी दिलेला हा सुखद धक्का गावकऱ्यांना समाधान देऊन गेला.
यावेळी गावकऱ्यांनीही बनकर यांच्याशी दिलखुलास चर्चा करून आपल्या समस्या मांडल्या . सरपंच रामदास बोरसे यांनी बनकर यांचे स्वागत केले. ग्रामस्थांनी रोजगार हमीमध्ये मजुरी कमी मिळणे, घरकुल योजनेसाठी ग्रामसेवक, सरपंच यांच्या कडून सहकार्य न मिळणे, मर्जीतल्यांनाच घरकुल मंजूर होणे, कृषी विभागाकडून सहकार्य नसणे, ठराविक राजकीय व्यक्तींना कृषी विभागाच्या योजनेचा लाभ देणे, व्यायाम शाळेतील साहित्याचा अभाव, काम करत नसलेली शालेय समिती गैरहजर रहाणारे शिक्षक आदि समस्यांचा पाढाच वाचला. यावर मुख्य अधिकारी बनकर यांनी गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर, त्र्यंबक गटविकास अधिकारी श्रीमती प्रमिला जाखालेकर, रामदास बोरसे राहुल बोरसे, अंबादास बोरसे, पावन बोरसे, अमृत पेंढार, निवृत्ती हिरकुड, चिंतामण गावित आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Chief executive officer's stay at Torangan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.