'शिवरायांची पगडी मानाची, पण त्याहूनही जबाबदारीची'; स्पष्ट बहुमतासाठी मोदींनी मागितला आशीर्वाद'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 03:02 PM2019-09-19T15:02:59+5:302019-09-19T15:04:36+5:30

गुजरात आणि महाराष्ट्र एकाचवेळी अस्तित्वात आले आणि त्या गुजरातमध्ये सर्वाधिक दीर्घ काळ मला नेतृत्वाची संधी दिली गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे.

'Chhatrapati Shivarai's turban is my responsibility; Bless the state for stable government Says Narendra Modi In Nashik | 'शिवरायांची पगडी मानाची, पण त्याहूनही जबाबदारीची'; स्पष्ट बहुमतासाठी मोदींनी मागितला आशीर्वाद'

'शिवरायांची पगडी मानाची, पण त्याहूनही जबाबदारीची'; स्पष्ट बहुमतासाठी मोदींनी मागितला आशीर्वाद'

Next

नाशिक - राजकीय अस्थिरतेमुळे महाराष्ट्र पिछाडीवर राहिला होता. अनेक शेतकऱ्यांचे बळी गेले. पाच वर्षापूर्वी असे स्थिर सरकार राहिले असते तर प्रगतशील महाराष्ट्र अधिक घोडदौड करू शकला असता. त्यामुळे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार देणे ही महाराष्ट्राची जबाबदारी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाजनादेश यात्रेच्या समारोपावेळी सांगितले. 

या सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, तेजस्वी महापुरुषांना जन्माला घालणाऱ्या महाराष्ट्र भूमीत   वसंतराव नाईक नंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार 5 वर्षे पूर्ण केले. गुजरात आणि महाराष्ट्र एकाचवेळी अस्तित्वात आले आणि त्या गुजरातमध्ये सर्वाधिक दीर्घ काळ मला नेतृत्वाची संधी दिली गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. महाराष्ट्राच्या पावन भूमीला माझा नमस्कार आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आज माझ्या जीवनाचा अमूल्य दिवस आहे कारण छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी माझ्या डोक्यावर पगडी ठेवली. शिवराय यांच्याविषयी माझे दायित्व आहे या पगडीचा सन्मान राखण्यासाठी माझं आयुष्य देऊ शकेल त्यासाठी आशीर्वाद द्या असं आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केलं. 

नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे 

  • 462 एकलव्य आदर्श शाळा देशभरात सुरू
  • राफेल लढाऊ विमान लवकरच वायुसेनेत दाखल होणार 
  • शरद पवार यांच्यासारखा नेता जेव्हा चुकीचे वक्तव्य करतो तेव्हा आश्चर्य होते
  • भारतीय सेनेचे हात बळकट केले जात आहेत आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करत आहोत
  • भारतीय जवनासाठीबुलेटप्रूफ जॅकेट ची गरज भाजप सरकारने पूर्ण केली
  • 2022पर्यंत भारत प्लॅस्टिकमुक्त  होणार त्यासाठी प्रयत्न वेगाने सूर
  • भारत आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुलेटप्रूफ जॅकेट निर्मिती आणि निर्यात करणारा देश बनला आहे
  • नाशिकमध्ये पुन्हा त्या प्रसंगाची आठवण होते आणि आज महा जनसागर उसळला
  • कुंभनगरीत लोककुंभ भरला आहे

  • आशा पूर्ण करणाऱ्याला महाराष्ट्र जनता आशीर्वाद देणार 
  • राजकिय पंडित लोकांनाही आवाहन आहे की वर्तमान राजकिय व्यवस्था वर लिखाण करावे
  • 60 वर्षानंतर विक्रम झाला की देशात पुन्हा बहुमताने सरकार स्थापन झाले
  • 5 वर्षांमध्ये सरकारने दिलेला विश्वास फडणवीस यांनी जनतेपुढे ठेवला
  • महाराष्ट्राला रोजगाराच्या संधी सरकारने दिल्या

  • देशाला विकासमार्गावर गतिमान करून त्याचा हिशोब जनतेपुढे वेळोवेळी देत राहणार
  • पुढील 5 वर्षात भारत सर्व कठीण आव्हानांना टक्कर देण्यासाठी अधिक सक्षम व बलशाली झालेला असेल
  • महाजनादेश यात्रा पूर्ण करणाऱ्या देवेंद्र फडणवीस या यात्रीला नमस्कार करण्यासाठी आलो
  • एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुकीच्या काळात मी नाशिकला येऊन गेलो तेव्हा मोठा जनसागर उसळला होता त्यावेळी भाजपा लाट मजबूत केली होती
  • भारतीय संविधान जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्याचा निर्णय संपूर्ण भरतवासीयांचा
  • जम्मू काश्मीर ला आतंकवादपासून मुक्त करणार

  • अब नया काश्मीर बनाना हैं, तेथे पुन्हा स्वर्ग साकारायचा आहे
  • काश्मीरच्या विकासाला हात देण्यासाठी पुढे या असं आवाहन 
  • देशात महाराष्ट्रमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले त्यामुळे शेकडो गावात दुष्काळ निवारण झाले 
     

Web Title: 'Chhatrapati Shivarai's turban is my responsibility; Bless the state for stable government Says Narendra Modi In Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.